ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवसेना दलित आघाडीचे शिवसंपर्क सामाजिक अभियान काजळा -ताडहादगावात संपन्न वंचित, भुमिहिनांसह नागरिकांची उपस्थिती

January 20, 202214:33 PM 56 0 0

बदनापूर/अंबड : शिवसेना दलित आघाडीचे शिवसंपर्क सामाजिक अभियान शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांच्या उपस्थितीत जिल्हाभरात दौरा सुरु केला असून बदनापूर तालुक्यातील काजळा व अंबड तालुक्यातील ताडहादगाव येथे घेण्यात आला. यावेळी तेथील नागरिकांच्या समस्या व शासकीय योजनेची माहिती दिली. या काजळा व ताडहादगाव येथील वंचित, भुमिहिनांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. शिवसेना दलित आघाडीच्या माध्यमातून राबविण्यात आलेले अभियान हे अत्यंत शिस्तबध्द व शासनाचे नियमांचे पालन करुन घेण्यात आले.

यावेळी दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाध साधतांना सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या अनेक समाजहिताच्या जनकल्याणकारी योजना प्रशासकीय यंत्रणेमार्पत राबविल्या जातात. परंतु समाज घटकातील उपेक्षितातील वंचित घटक आज सुध्दा महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचा या शिवसंपर्वâ सामाजिक अभियानाचा उद्देश असल्याचे शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्करराव मगरे यांनी सांगितले. तसेच हे अभियान जालना जिल्ह्यातील गाव, वाडी, तांडा वस्तीपर्यंत पोहचले आहे. सरकारच्या योजना राबविण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गावस्तरावर अनेक समित्या कार्यरत आहेत. मनारेगा राज्यापासून तालुकास्तरापर्यंत या मधून ग्रामीण भागातील अल्पभुधारक शेतकरी आणि शेतमजुरांना रोजगार मिळाला पाहिजे. परंतु ते होतांना दिसत नाही. दक्षता समिती शासनाचे अन्नधान्य वितरण व्यवस्थीत गरजु लाभाथ्र्यापर्यंत मिळाले पाहिजे. निराधार समिती मार्पâत वयोवृध्द शेतमजुर, विधवा, दिव्यांगसाठी समितीमार्पâत निहाय मेळावे घेवून वंचित लाभाथ्र्यांला लाभ मिळाला पाहिजे. परंतु तसे होतांना दिसत नाही. महाराष्ट्र शासनाचा महाआवास घरकुल योजना वंचितांना घरकुल मिळत नाही, शासनाचे तरुण बेरोगारांसाठी असलेले आर्थिक विकास महामंडळे बेरोजगार तरुणाला उद्योगासाठी भांडवल निर्माण करुन देतात. मात्र पाहिजे त्या तरुण बेरोजगाराला त्याचा लाभ मिळत नाही, अशा प्रकारे अनेक शासनाच्या योजना राबविल्या जातात. मात्र खरा लाभार्थी या योजनेपासून दुर आहे. त्यामुळे शिवसेना दलित आघाडी शिवसंपर्क सामाजिक अभियान राबविण्याची गरज आहे, असेही मगरे यांनी सांगितले. यावेळी अंबड तालुक्यातील ताडहादगाव येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख शैलेश दिवटे, ज्ञानदेव वाघमारे तर काजळा येथील बाबासाहेब बोबडे, संतोष बोबडे, मोविंâद तुपे, कडूबा बोबडे, बाबुराव बोबडे, पावलस महापुरे, अशोक निकाळजे, कडूबा पैठणे, पंडीत महापुरे, दाविद महापुरे, सुमनबाई महापुरे, संगीता महापुरे, विमलबाई महापुरे, मिल्लाबाई महापुरे, यांच्यासह शिवसेना दलित आघाडीच्या प्रमुख पदाधिकाNयांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *