ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

धक्कादायक : पुण्यात सासर्‍याने दिली सुनेच्या हत्येची सुपारी पण आरोपींनी सासऱ्याचाच केला खून

December 5, 202016:22 PM 96 0 0

दुसऱ्याला खड्ड्यात ढकलण्याच्या प्रयत्नात माणूस स्वतःच खड्ड्यात पडतो हे विधान नेहमी ऐकायला मिळते. पण, याची प्रचिती यावी, अशी घटना पुण्यात घडली आहे. मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा अर्थात दुसऱ्या सुनेच्या खूनाची सुपारी देणाऱ्या सासऱ्याला स्वतःच जीव गमवावा लागला. सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड येथे घडली आहे. विनायक यांचा मुलगा अजित याचा विवाह झाला होता. मात्र, विवाह झालेला असताना अजितने कुटुंबीयांना माहिती न देता दोन वर्षापूर्वी प्रेम विवाह केला होता. याची माहिती वडील विनायक यांना काही महिन्यांपूर्वी कळाली. त्यातून विनायक यांचे मुलगा अजितसोबत भांडण होऊन खटके उडायला लागले. सतत भांडण सुरू झाली. हे सर्व दुसरा विवाह केल्यामुळे होत असल्याचं विनायक यांना वाटू लागलं.

मुलाचा पहिला संसार विस्कटल्याचं दुःख त्यांना होत होतं. त्यामुळे त्यांनी मुलाच्या दुसऱ्या पत्नीचा खून करण्याचा कट रचला. त्यासाठी त्यांनी आरोपी अविनाश बबन राठोड, मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू आणि मोहम्मद वसीम जब्बार यांना टप्याटप्याने १ लाख ३४ हजारांची सुपारी दिली. आरोपींनी गोवा आणि उत्तर प्रदेश येथून दोन पिस्तुल आणली आणि खुनाचा कट रचला. परंतु, महिलेचा खून करायचा असल्याने आरोपी घाबरले होते. त्यामुळे उशीर लागत होता. दरम्यान, मयत विनायक (सासरे) हे सुनेचा खून कधी करणार? होत नसेल तर पैसे परत करा, असं म्हणत त्यांनी आरोपीकडे तगादा लावला होता. विनायक हे पैसे परत मागत असल्याने आरोपींनी त्यांना खेडमधील वराळे येथे बोलावून त्यांचा गळा दाबून त्यांचा खून केला. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड च्या म्हाळुंगे पोलिसांनी दोन आरोपींना पिस्तुलासह अटक केली असून, इतर एकाचा शोध पोलीस घेत आहेत. अविनाश बबन राठोड आणि मोहम्मद शहजाद इस्लाम उर्फ छोटू अस अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर, मोहम्मद वसीम जब्बार हा फरार आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *