ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

धक्कादायक; सोलापूरमध्ये टेम्पो चालकानं वाहतूक पोलिसाला चिरडलं

December 6, 202016:31 PM 30 0 0

सोलापूरमध्ये एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर ट्रक घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये वाहतूक पोलीस सागर चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, याची गंभीर दखल घेत याप्रकरणी उच्चस्तरीय बैठक बोलवणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, माढा तालुक्यातील वरवडे गावाजवळील टोल नाक्याजवळ ही घटना घडली आहे. या ठिकाणी एका वाहतूक पोलिसाच्या अंगावर चालकाने ट्रक घातला. यामध्ये वाहतूक पोलीस सागर चोबे यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालक नवनाथ बिबळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, ट्रक चालकावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगताना पोलिसांवरील हल्ल्यांसदर्भात लवकरच उच्चस्तरीय बैठक बोलावणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. अधिवेशन काळात यासंदर्भात आपण एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहोत. विशेषतः महामार्गावरील वाहतूक पोलिसांना आणि संबंधित सर्वच यंत्रणांबाबत या बैठकीत एकत्रीत चर्चा होईल, असं त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. चालक बेदरकारपणे महामार्गावर वाहनं चालवतात, यासाठी आत्ताच्या नियमांपेक्षा अधिक कडक नियम करणं आवश्यक आहे. वाहतुकीचे नियम पहिल्यांदा, दुसऱ्यांदा मोडल्यास शिक्षा होते पण वारंवार जर हे झालं तर त्याचं लायसन्स रद्द करणं गरजेचं असल्याचंही देसाई यावेळी म्हणाले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *