ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

धक्कादायक : OLX वर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कार्यालय विक्रीला

December 18, 202019:13 PM 56 0 0

देशाला धक्का देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय चक्क OLX वर विक्रीला टाकत त्याची किंमत ७.५ कोटी रुपये सांगण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीतील कार्यालयाचा फोटो OLX वर टाकत त्याची विक्री किंमत ७.५ कोटी रुपये सांगण्यात आली. या जाहिरातीत कार्यालयाच्या आतील माहिती, खोल्या आणि पार्किंगच्या सुविधेबद्दलही सांगण्यात आलं आहे. हे प्रकरण पोलिसांकडे आल्यानंतर OLX वरुन मोदींच्या कार्यालय विक्रीची जाहिरात हटवण्यात आली आहे.

पोलिसांकडून कारवाईची माहिती
वाराणसी पोलिसांनी एक व्हिडीओ शेअर करुन या प्रकरणात कारवाई केली आहे. चार जणांना ताब्यात घेतलं असून एका अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय वाराणसी येथील भेलूपूर पोलीस ठाणे हद्दीतील जवाहर नगर परिसरात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात रोज बरेच लोक येत असतात. वाराणसी मतदारसंघातले नागरिक या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडत असतात. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीचा दौराही केला होता. तसंच अनेक कार्यक्रमांना त्यांनी VC अर्थात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारेही हजेरी लावली होती.

Categories: राष्ट्रीय
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *