ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पंचतारांकित हॉटेलमध्ये अभिनेत्रीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार

February 2, 202113:40 PM 21 0 0

मुंबईमध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एका महिला अभिनेत्रीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित अभिनेत्री हॉटेलमध्ये एका वेब सीरीजच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने राहत होती. तिचं दिवसभरातील चित्रीकरण संपवून वॉशरूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेली असताना ही घटना घडल्याचं समजतंय.

दक्षिण मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचं वृत्त पीटीआयने दिलं असून याप्रकरणी रविवारी हॉटेलमधील एका कर्मचाऱ्याविरोधात मुंबईतील एन.एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अभिनेत्री हॉटेलच्या ३७ व्या मजल्यावरील एका वॉशरूममध्ये कपडे बदलण्यासाठी पीडित गेली होती. त्यावेळी अचानक आरोपी दिलेश्वर महंत (वय- २२) याने तिला पकडून तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने ओरडण्याचा प्रयत्न करताच आरोपीने तिला घट्ट पकडून ठेवले. आरोपीच्या तावडीतून महिलेने कशीतरी स्वतःची सुटका करुन घेतली. त्यानंतर आरोपी महंतला हॉटेलमधील इतर कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले.

या प्रकरणी रविवारी अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरोधात एन.एम. जोशी मार्ग पोलिस स्थानकात विनयभंगासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अजून चौकशी सुरू आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *