ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शॉर्ट सर्किटमुळे ऑईल मिलला आग,मशिनरी जळून खाक; 8 ते 10 लाखाचे नुकसान

March 7, 202112:30 PM 10 0 0

जालना / प्रतिनिधी : नवीन औद्योगिक वसाहती मधील बालाजी ऑईल मिलला आग लागल्याने मोठं नुकसान झालं आहे.या आगीत कंपनीतील मशिनरी जळून खाक झाली आहे.नवीन औद्योगिक वसाहती असलेल्या बालाजी ऑईल मिल या कंपनीत सरकी पासून खाद्यतेल आणि पशुखाद्य बनवल्या जाते. आज रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कंपनीत जोडलेल्या वायरींगमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.या आगीत तेल आणि पशुखाद्य तयार करण्यासाठी वापरली जाणारी लाखो रुपयांची मशिनरी जळून खाक झाली आहे.

यामुळे उद्योगाच्या मालकांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.ही आग येथील काम करनाऱ्या कामगारांना कळताच त्यांनी ऑईलमील मधील 10 फायर बॉल फोडले यातील 7 फायर बॉल फुटले तीन बॉल हे निकामी झाले असून या आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी अर्ध्या तासात लागलेली आग आटोक्यात आणली.आग विझवताना अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारल्यामुळे ऑईल मिल मधील कच्चा माल देखील ओला झाला आहे.अग्निशमन दलाच्या स्विफ्ट इन्चार्ज संदीप दराडे, फायरमॅन नितेश ढाकणे, रवी बनसोडे, अशोक वाघमारे, किशोर सकट, रवी तायडे, या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने तातडीने आग आटोक्यात आली.यात 8 ते 10 लाखांचे नुकसान झाल्याचे ऑइल मिलचे संचालक मनोहर सिनगारे यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *