ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्राध्द आणि श्रध्दा

September 24, 202113:18 PM 19 0 0

आपल्याकडे पितृ पंधरवड्यात श्राध्द करण्याची पध्दत आहे. श्रध्देने करतात ते श्राध्द ! आपल्या मृत वाडवडिलांचे स्मरण करणे , त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा यामागील मुख्य हेतू !
साधारणपणे पारंपरिक पध्दतीने श्राध्द केले जाते. काही व्यक्ती मात्र यासंदर्भात वेगळा विचार करताना दिसतात. मळलेल्या वाटेवरून चालत राहणे नेहमीच सोपे असते. पण प्रवाहाबरोबर न चालणार्‍यांना मात्र टीकेला सामोरे जावे लागते.

श्रध्देची संकल्पना बदलणार्‍या , नवे पर्याय शोधून ते कृतीत आणणार्‍या व्यक्ति आणि संस्था – संघटनाच समाजात विधायक बदल घडवून आणतात.
पतिच्या निधनानंतर एकट्या राहणार्‍या वीणाताई पितृपक्षात कावळ्याला पान न ठेवता एका गरजू कुटुंबाला / सेवाभावी संस्थेला आर्थिक मदत करतात. मंदाताईंना विणकामाचा छंद आहे. आईची आठवण म्हणून त्या अनाथालयातील बालकांना स्वेटर्स विणून पाठवतात.
काही मंडळी पितृपक्षात एखाद्या वृध्दाश्रमाला भेट देतात. तिथल्या वृध्दांसोबत थोडा वेळ घालवतात. त्यांच्यासोबत एकत्र जेवण किंवा चहा नाश्ता घेतात. त्याचा खर्च आश्रमाला देणगीरूपात देतात.
आपण या मंडळींच्या कृतीचे अनुकरण केले तर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पुढे जाणे निश्चितपणे शक्य होईल. बघा पटतंय का ..?

भारती मोरे.
डोंबिवली.

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *