ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

१० डिसेंबर पासून खुरगाव येथे श्रामणेर प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ

December 9, 202113:38 PM 61 0 0

नांदेड – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात उद्या दि. १० डिसेंबर पासून श्रामणेर प्रशिक्षण शिबिराला सुरुवात होणार आहे. दीक्षा घेऊ इच्छिणाऱ्या बौद्ध उपासकांनी उद्या दुपारपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन श्रामणेर प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे.

ऋषीपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे दहा दिवसीय श्रामणेर प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ होणार आहे. या शिबिरात भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भंते संघरत्न, चंद्रमणी, धम्मकिर्ती, सुदर्शन, श्रद्धानंद, शाक्यपुत्र, संघमित्र, सुनंद सुदत्त, सुयश, शिलभद्र, सुगत, संघानंद, संघदीप, सुजात हा भिक्खू संघ नवदीक्षित श्रामणेरांना मार्गदर्शन करणार आहेत. फोनवरून शिबिरपूर्व नावनोंदणी करण्यासाठी भदंत पंय्याबोधी थेरो ८३०८८८७९८८, भंते श्रद्धानंद ९५७९२०९७५२, साहेबराव इंगोले ८१४९०२६०३४, गंगाधर ढवळे ९८९०२४७९५३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, विलास वाठोरे यांनी कळविले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *