मुरूड जंजिरा प्रतिंनिधी (नैनिता कर्णिक) : चांद्रसेनिय कायस्थ प्रभु समाज व देवस्थान ट्रस्ट मुरुड जंजिरा तफे॑ दरवर्षी श्रावणी सोमवार मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असे परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या वर्षी ही पहिला श्रावणी सोमवार साधेपणाने साजरा करण्यात आला.
या श्रावणी सोमवारी सकाळी मुरूड जंजिरा येथील दांपत्य श्री व सौ प्रतिभा अरविंद गायकर यांच्या हस्ते श्री भोगेश्वर मंदिरात १००० बेलपत्र वाहून षोडपचार पूजाअर्चा करण्यात आली या वेळी सौ शीतल तटकरे दांपत्य तसेच सालकरी पूजारी सुभाष गुरव उपस्थित होते.
कोरोना संकट लवकर समुळ नष्ट होऊदे अशी परमेश्वरासमोर प्रार्थना करून सांगता केली.
Leave a Reply