मुरूड जंजिरा ( सौ नैनिता कर्णिक) रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजिरा येथील ग्रामदेवता श्री कोटेश्वरी मातेचे मंदिर गावाच्या वेसीवरच आहे या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी श्रावणोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला.
तळेपाखाडी मुरूड जंजिरा येथील शारदा महिला मंडळाच्या वतीने श्रावणोत्सव आयोजित करण्यात आला.शारदा महिला मंडळ अध्यक्षा सौ मनाली मानकर, उपाध्यक्षा श्रोमती.सारीका भायदे सहमहिलांनी श्रावण महिन्याचे औचित्य साधून साडी, खण, नारळानी ओटी भरली.पेढ्याचा नैवेद्य दाखवला.सर्व महिलांनी आरती केली. यावेळी उपस्थित भगिनीनी आपल्या सुरेल आवाजात गाणी गायली. यावेळी सौ. उषा खोत यांनी श्री. कोटेश्वरी मातेला साडी परिधान केली.
सर्व महिलांनी कोरोना संकटापासून रक्षण करण्यासाठी प्रार्थना केली.अशा
प्रकारे शारदा महिला मंडळाच्या वतीने श्रावणोत्सव सोहळा श्री कोटेश्र्वरी मंदिरात साधेपणाने पण उत्साहात साजरा करण्यात आला.
Leave a Reply