ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्रीराम नवमी थाटामाटात आणि उत्साहात साजरी

April 11, 202215:55 PM 32 0 0

पनवेल (छाया म्हात्रे) : प्रसवतील त्या तिन्ही देवी श्रीरामाचे अंश मानवी धन्य दशरथा तुला लाभला देव पित्याचा मान. यज्ञ प्रारंभ होताच प्रसन्न होऊन यज्ञातून अग्निदेव उत्पन्न झाले. अग्नि देवतेने दशरथ राजाला पायस दान दिले. आणि त्याच्या सेवनाने तिन्ही देवींना पुत्र प्राप्ती झाली. श्रीराम हे भगवान विष्णु यांचे सातवा अवतार. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराज दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौशल्या यांचे पुत्र. त्यांचा जन्म चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला. प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम, सत्यवचनी, एक पत्नीव्रत व परम दयाळू होते. अवघ्या भारत देशात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
पनवेल मधील श्रीमहागणपती मंदिर हॉलमध्ये श्रीराम जन्मोत्सव अगदी उत्साहात आणि थाटामाटात साजरा करण्यात आला. मंडळातल्या भगिनींनी फुलांच्या माळांनी पाळणा सजविला होता. सर्व भगिनींनी श्रीरामांची भजनं व पारंपारिक गाणी एका सुरात, एका तालात गायली प्रभूंच्या पाळण्याला झोके देत श्रीरामांचा पाळणा गायला.
सोसायटीतल्या हौशी भगिनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. मुख्य म्हणजे आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर ह्या उपस्थित होत्या. राम जन्मला ग सखे राम जन्मला असं म्हणताना प्रत्येकीचा ऊर भरून आला होता. कारण राम हे शब्द उच्चारताच मन प्रसन्न आणि प्रफुल्लीत होते. प्रत्येकीला गुलाब पुष्प देण्यात आले. जन्मोत्सवाचा मुख्य प्रसाद म्हणजे सुंठवडा. आपल्या शरीरास आवश्यक व उपयुक्त आहे. तसेच थंड पेय आणि पेढे देऊन सर्व भगिनी॑चे तोंड गोड करण्यात आले. अशा आनंदमय वातावरणात, उत्साहात आणि थाटामाटात श्रीरामाचे जन्मोत्सव श्रीराम नवमी साजरी करण्यात आली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *