जालना ( अनिता पवार)- शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी स्थानिक श्रीकृष्ण नगर येथे,श्री आर. वाय. दहेकर यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त श्रीकृष्ण भजनी मंडळातर्फे भजन संध्या आयोजित करण्यात आली होती.
श्रावण सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी यांची पर्वणी साधत भजनी मंडळातील महिलांनी आपल्या सुरेल सुमधुर आवाजामध्ये भगवान शंकराच्या भजनांनी तसेच गवळणीच्या गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अनिता दहेकर आणि सारिका दहेकर यांनी राधा-कृष्णाची वेशभूषा करून उपस्थित महिलांना गवळणीच्या चालीवर ठेका धरायला लावला. यावेळी यशश्री दहेकर या बालिकेने सुद्धा श्रीकृष्णाची वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. उपस्थितांसाठी फलाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. फलाहारानंतर श्री आर.वाय. दहेकर यांच्या एका गवळण आणि भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Leave a Reply