ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्रीमत् परमहंस स्वामी परमानंद महाराज समाधी मठावर मुंबईकर परिवाराने केलं गाय दानाचं पुण्यकर्म

April 19, 202216:59 PM 33 0 0

रायगड  (संगीता ढेरे) : आपल्या हिंदू धर्मात …गाय,गायत्री आणि गंगा ह्या तीन गोष्टीनां अनन्यसाधारण महत्व आहे धार्मिक मान्यतेनुसार आणि ज्योतिष शास्त्रानुसार गायीला फार फार महत्व दिलं जातोय वास्तूशास्त्रानुसार वास्तुदोष असणार्या एखाद्या घरात गायीच्या नुसत्या असण्याने त्या घरातील वास्तूदोषांचा नाश होतं तर धर्मशास्त्रानुसार तिच्या पूजनाचे सर्व देवांच्या पूजनाचे फळ प्राप्त होत …म्हणून …गायीला …फक्त पशु म्हणून न पाहता हिंदू धर्मात गायीला आईचं (गोमाता ) स्वरूप मानलं जातोय पूजलं जातोय !…सोबतच आपल्या जीवनात आपण केलेल् दान सुद्धा एक सत्कार्याचे रूप आणि दैवी गुण आहे असं मानलं जातोय !…आपल्या जवळ जे काही आहे ते निस्वार्थीपणे दुसऱ्याला देणं म्हणजे दान करणे होयं !…आणि आज पर्यंत अनेक सत्कार्याच्या माध्यमातून दिन-दुबळ्यां गरीब-गरजूवंतानां मदतरुपी दानधर्म करणारं व्यक्तिमत्व मा.श्री राजू मुंबईकर साहेब यांनी आज एक पुण्यकर्माचं कार्य केलं ते … श्री स्वामी परमानंदाश्रम ट्रस्ट मु.दादर,( परमानंद वाडी ) ता.पेण,जि.रायगड ..यांच्या समाधी मठावरील आश्रमात .. एक गिर जातीच्या… गोमातेला … …गायदान …स्वरूपात समाधी मठावर अर्पण करण्यात आली.
दान- धर्म आणि पूजा-कर्म …केल्याने मनुष्याला जीवनात पुण्यकर्माचं भाग्य लाभतं !…आणि आज हेच गायदानरुपी पुण्यकर्म करून श्री राजू मुंबईकर साहेब.. यांनी सत्कार्य केलं श्रीमत् परमहंस श्री समर्थ स्वामी परमानंद महाराज समाधी मठावर सत्संगासोबत विविध धार्मिक कार्यक्रमांच आयोजन होत असतं त्याच सोबत तिथे होम-हवन विधी पार पडत असतात, अश्या धार्मिक पूजा-अर्चाच्यां प्रारंभी वास्तूशुद्धी करिता …गोमूत्र आणि ..गायीच्या शेणाचा …प्रमुख्याने उपयोग केला जातो आणि त्याच महत्व देखील खूप आहे .गोमूत्रात पोटॅशियम, कॅल्शियम,मॅग्नेशियम,कार्बोलिक ऍसिड ,सोडियम या सारखी अनेक खनिजद्रव्य असतात त्यामुळे शरीरातील बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन देखील नाहीसे होतात सोबतच वातावरणातील बॅक्टेरिया देखील नष्ट होतात त्याच्यातच गिर जातीच्या गायीच्या गोमूत्राचं महत्व हे विज्ञानाने देखील मान्य केलं आहे …गायीच्या शेणाला देखील धर्मशास्त्रात खूप महत्व दिले गेलं आहे…याच वैज्ञानिकदृष्टया आणि धार्मिक दृष्ट्या महत्व असलेल्या ह्या …गिर जातीच्या … गायदानाला देखील खूप महत्व प्राप्त झाले आहे. श्री राजू मुंबईकर साहेब आणि सौ.राणिताई मुंबईकर यांच्या सोबत त्यांचे पिताश्री … मा.श्री बळीराम मुंबईकर आणि त्यांच्या दोन सुकन्या … वैष्णवी मुंबईकर ,सृष्टी मुंबईकर, प्रतीक्षा म्हात्रे या परिवाराने गोमातेच यथासांग पूजन करून पुरोहिताच्या हस्ते,महाआरती,पूजाअर्चा करून परमानंद स्वामींच्या चरणी गोमातेच दान केलं आणि स्वामींच्या मठावरील सेवेकरी महाराज मंडळींनां गोड-धोंड मिठाईचं वाटप करून आपल्या परिवारासोबत मठावरील सर्व मंडळींच्या सोबतीनं भोजन पंगती वाढून अन्नदानाचं पवित्र कार्य सुद्धा केले गेले आणि लवकरच येथे एका सुंदर प्रशस्थ अश्या गोशाळेचं सुद्धा पूजन आणि बांधकाम केलं जाईल अशी ग्वाही येथील सेवेकरी महाराज मंडळी आणि सर्व ट्रस्टी मंडळींनी दिली.
ह्या गायदाना सारख्या पवित्र धार्मिक कार्यक्रमा प्रसंगी श्री राजू मुंबईकर यांच्या परिवारा सोबत श्री स्वामी परमानंद महाराज समाधी मठावर उपस्थित राहिले ते … श्री अनिल घरत,श्री संपेश पाटील,श्री क्रांती म्हात्रे श्री अरविंद पाटील यांच्या सोबत मठावरील सर्व सेवेकरी महाराज मंडळींसाय उपस्थितीत हा गायदानाचा पवित्र सोहळा मोठ्या धार्मिक वातावरणात संपन्न झाला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *