ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

युगानुयुगे गुण तुझे गाऊ …धन्य-धन्य मॉ जिजाऊ। सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीतर्फे अभिवादन सोहळा

January 13, 202112:21 PM 42 0 0

जालना ( प्रतिनिधी) : स्वराज्य प्रेरिका, राष्ट्रमाता ,राजमाता, मॉ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी ( ता. १२) जालना शहरात सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने जिजाऊ वंदना व अभिवादन सोहळा घेण्यात आला.

दरवर्षी मोठ्या धुमधडाक्यात व जल्लोष पूर्ण वातावरणात साजरा होत असलेल्या जिजाऊ जन्मोत्स वावर यंदा कोरोना संसर्गाचे सावट असल्याने सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष अंकुश पाचफुले ,कार्याध्यक्ष शुभम टेकाळे व कार्यकारिणीच्या वतीने अत्यंत साधेपणाने उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला.
त्या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सामूहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली व अभिवादन करण्यात आले.
या वेळी माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत , युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर, शिवसेना शहर प्रमुख तथा गटनेते विष्णू पाचफुले, नगरसेवक महावीर ढक्का, विजय पवार, प्रा. राजेंद्र भोसले,अशोक पडूळ, संतोष कऱ्हाळे, जिजाऊ ब्रिगेडच्या विभावरी ताकट, सर्व पक्षीय जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष अंकुश पाचफुले, कार्याध्यक्ष शुभम टेकाळे, करण पाटील जाधव, ॲड रोहित बनवसकर, आकाश जगताप, अनिरुद्ध झाल्टे, गणेश सोळणे, सुरज धबडकर, बाबासाहेब देशमुख, बाबा गवळी, विकी सेना , अजय उबाळे, पार्थ मोरे ,अनिल ढवळे, भागवत जाधव, संकेत निकम ,सौरभ भिसे, हर्ष खरात, महेश नागवे, यांच्या सह उत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, व शिव प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

समिती तर्फे कोरोना योध्द्यांचा सन्मान : अंकुश पाचफुले

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उत्सव समितीच्या वतीने अत्यंत साधेपणाने व शासकीय नियमांचे पालन करून राष्ट्रमाता, राजमाता, मॉ जिजाऊ यांना अभिवादन करण्यात आले. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत जालनेकरांना कोरोना पासून वाचण्यासाठी जीव धोक्यात घालून कार्यरत असलेल्या डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी, पोलीस स्वच्छता कर्मचारी यांचा उत्सव समितीच्या वतीने गौरव करण्यात येणार आहे. असे उत्सव समितीचे अध्यक्ष अंकुश पाचफुले यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *