प्रिय भाऊ,
प्रसाद शंकरराव वागरे
सहा.पोलीस निरीक्षक(मुंबई)
यास अनेक शुभ आशिर्वाद
वि.वि पत्रास कारण की,
राखी पौर्णिमा जवळ येत आहे,बाजारात विविधरंगानी नटलेल्या राखी नजरेस पडल्या आणि खरचं…मला तुझी खूप आठवण आली रे.मला आठवलास तू अगदि लहानपणीचा छोटासा,गुबगुबीत तल्लख बुध्दीमत्तेचा दिसायला ही खूप गोड तेवढाच शांत…समजदार.इतर बहीण भावा सारख आपण कधी भांडण केल्याच आठवत नाही रे…तूझ्यासोबत खेळतांना तू मला जयहिंद चे नारे द्यायला लावायचास आणी मी पण,तुझ्या आदेशाचे पालन करत जोरजोरात जयहिंद
म्हणायची…तेव्हा जो आनंद मिळायचा ना तो खरचं शब्दात व्यक्त करता येत नाही.लहानपणापासूनच देशप्रेम तूझ्या नसानसात भरलेल होत…तूला आठवत का रे “छोटा जवान”हा चित्रपट पाहिलास आणि कीती रे रडलास… मला आता सैनिक व्हायच नाही म्हणून.तुला समजून सांगीतल तेव्हा कुठे शांत झालास.खूप मंतरलेले होत रे आपल बालपण…आई पप्पांनी पण आपले सारे लाड पूरवले…अगदि यथेच्छ खेळलोत,बागडलोत…माझ्यापेक्षा लहान असूनही तू माझा पाठीराखा झालास…आज तू एक कर्तव्यदक्ष पोलिस आॅफीसर आहेस.कामामूळे तूला राखीपौर्णिमेला हजर राहाता येत नाही…याच खूप दु:ख वाटत.दूस-यांच्या भावाला राखीपौर्णिमेला बहिणींच्या घरी आलेल पाहून मन भरुन येत रे.कोरोनाकाळात तू मुंबई मध्ये राहून आपले कर्तव्य बजावलेस…अख्खा देश घरात सुरक्षित बसलेला असतांना तू रस्त्यावर आहोरात्र ऊभा होतास अगदि उपाशी….जो भाऊ जनतेच रक्षण जिवापाड करु शकतो तो बहिणीप्रती असलेले कर्तव्य देखिल व्यस्थित पार पाडतो…खरचं,प्रसाद मला तूझा खूप अभिमान वाटतो.
कोणती राखी तुझ्यासाठी निवडावी असा प्रश्न मला नेहमीच पडतो, पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम अगदी जबाबदारीने पार पाडतोस…नातं- तुझं माझं अगदी या राखीसारखं आहे … कधी रंगीत.. कधी गंधीत तर कधी मऊ कापसासारखं…मी खूप भाग्यवान आहे मला तूझ्यासारखा आणि हेमंत सारखा प्रेमळ भाऊ लाभला.आई पप्पांच्या आशिर्वादाने मी माझ्या संसारात सूखी-समाधानी आहे…तूला सूख समाधान आणि आरोग्य लाभाव एवढीच या बहिणीचा इच्छा..!मी पाठवलेली राखी तूला भेटलीच असेल,काळजी घे.आणि जमल्यास लवकर नांदेडला येण्याचा प्रयत्न कर तुझ्याच प्रतिक्षेत…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा…!
जगामध्ये बहिण भावाचे नाते
सर्व नात्यात श्रेष्ठ आहे…
म्हणून तर काळजाला
काळजाची निरंतन ओढ आहे
कीतीही दूर असलो तरी
तरी…यात प्रेमाचा रंग आहे
आठवणींने भारल्या काळजाचे
नाते अमृताहूनही गोड आहे
सुख,दु:खाच्या हळव्या क्षणांत
पाठीराखा भाऊच होतो….
चंद्र,तारे ही फीके त्याच्यापूढे
जगण्याचा तो श्वास असतो
बालपणीचा सखा,सोबती
भाऊ..कौतुकाची थाप होतो
निर्व्याज मायेच आभाळ होऊन
तो जगासाठी धाक असतो…
तुझं लाभावी यश,कीर्ती
सुखद क्षणांत तू भिजावे चिंब
बंध नात्याचे दृढ होताना…
वृध्दींगत व्हावेत ऋणानुबंध
तूझीच बहिण
रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१
Leave a Reply