ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सॅनिटायझर प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू

April 24, 202113:16 PM 8 0 0

यवतमाळ : दारुची लत भागवण्यासाठी दारु म्हणून सॅनिटायझर प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळमध्ये ही घटना घडली आहे. यातील तिघांचा घरी तर तिघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यक्तिरिक्त सर्व दुकान बंद ठेवण्यात आली आहे. तसेच दारुच्या दुकांनानाही केवळ ऑनलाईन विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक तळीरामांना दारु खरेदी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच यवतमाळमध्ये दारु न मिळाल्याने सॅनिटायझर प्यायलेल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनमध्ये दारुची दुकान बंद आहेत. त्यामुळे दारुची लत भागवण्यासाठी यवतमाळमधील काही जणांनी सॅनिटायझर प्यायले आहेत. यात 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. यातील सहा मृतांची नावे समोर आली आहेत.

मृतांची नावे
दत्ता लांजेवार
नूतन पाथरटकर
गणेश नांदेकर
संतोष मेहर
सुनील ढेंगळे
गणेश शेलार

दरम्यान यातील तीन जणांचा घरीच मृत्यू झाला होता. तर इतर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे समोर येत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *