ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जेएनपीटीतुन आता रक्तचंदनानंतर बंदी असलेल्या चीनी बनावटीच्या ड्रोनची तस्करी : पावणे पाच कोटी किमतीचे १२०० ड्रोनचा साठा जप्त : क्राइम इंटेलिजेंस युनिटची कारवाई

March 21, 202216:56 PM 22 0 0

उरण (संगिता पवार ) : जेएनपीटी बंदरातुन रक्तचंदनानंतर आता चीनच्या बंदी घालण्यात आलेल्या खेळण्यातील ड्रोनच्या तस्करीला सुरुवात झाली आहे.न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाच्या क्राइम इंटेलिजेंस युनिटच्या अधिकाऱ्यांनी इंधन पंपाच्या नावाने आयात करण्यात आलेले १२०० ड्रोनच्या साठा एका ४० फुटी कंटेनरमधुन ताब्यात घेण्यात आला आहे.तस्करी मार्गाने आयात ड्रोनची किंमत सुमारे पाच कोटींच्या घरात आहे.याआधीही डीआरआयच्या विभागाने ३६ ड्रोनचा साठा जप्त केला होता. जेएनपीटी बंदरातुन याआधी सोने,चांदी, शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ, सापांची कातडीची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात होती.त्यानंतर मागील काही वर्षांपासून आखाती देशात निर्यात होणाऱ्या रक्तचंदनाच्या तस्करीला उधाण आले आहे.त्यानंतर आता देशात बंदी घालण्यात आलेल्या चीनच्या ड्रोनच्या तस्करीला सुरुवात झाली आहे.
न्हावा-शेवा बंदरातील क्राइम इंटेलिजेंस युनिटने बंदी नंतरही चीनमधून तस्करी मार्गाने आयात करण्यात आलेला १२०० ड्रोनच्या साठा कारवाई करत नुकताच जप्त केला आहे.चीनमधुन खेळणी आणि इंधन पंपाच्या नावाने हा ड्रोनचा साठा जेएनपीटी बंदरामार्गे एका एजन्सी मार्फत आयात करण्यात आला होता. खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावरच बंदीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा साठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे.या १२०० ड्रोनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पावणे पाच कोटींच्या घरात आहे.याआधीही जेएनपीटी बंदरातुन चीनमधुन आयात करण्यात आलेल्या १४.११ लाख किमतीचा ३६ ड्रोनचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
देशातील ड्रोनच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारत सरकारने काही अपवादांसह परदेशी ड्रोनच्या आयातीवर बंदी घातली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत फॉरेन ट्रेड महासंचालनालयाने (DGFT) गेल्या महिन्यात परदेशी ड्रोनच्या आयातीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *