ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

…तर समतेचा विचार घेवून चालणाऱ्या माणसाला दुःख होते :  खोतकर

February 8, 202215:51 PM 39 0 0

जालना (प्रतिनिधी) : एकमेकांच्या ताटात जेवणारी माणसं जेव्हा चार टाळकी एकमेकांना भडकवण्याचे काम करतात अशा प्रसंगी समतेचा विचार घेवून चालणाऱ्या माणसाला दुःख झाल्याशिवाय राहवत नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आज येथे बोलतांना केले. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना. छगनराव भुजबळ यांच्या आदेशानुसार समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज दि. 7 फेबु्रवारी सोमवार रोजी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, विभागीय अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत, जालना जिल्हाध्यक्ष नवनाथ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना खोतकर म्हणाले की, सर्व जाती-धर्माचे लोक अत्यंत गुण्या गोविंदाने एकत्र राहतात.

मात्र तेच लोक एकमेकांच्या विरोधात बोलल्यानंतर माणसाच्या मणाला वेदना होते. ओबीसी समाजाचा मोर्चा जालना येथे काढण्यात आला होता त्यावेळी आपण स्वतःहून या मोर्चात सहभागी झाल्याचे सांगुन प्रत्येक समाजाला आपले दुःख मांडण्याचे व्यासपीठ त्या त्या समाजातील व्यक्ती पदाधिकारी करत असतात. परंतू काही माणसं या बाबींच भांडवल करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. फुले-शाहू-अंबेडकर या महापुरूषांनी समाजामध्ये चांगले संस्कार रूजविण्याचा प्रयत्न केला असला तरी ज्यांच्या मेंदूत कपट आहे. अशा व्यक्तींमुळे अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते असे देखील खोतकर यावेळी म्हणाले.
यावेळी बोलतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा ओबीसी नेते भास्करराव अंबेकर म्हणाले की, राज्यातील ओबीसी समाजाला संघटीत करण्यासाठी समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांनी समता परिषदेची स्थापना करून राज्याचे महसुल मंत्री असतांना श्री भुजबळ यांनी समता परिषदेचे पहिले अधिवेशन जालना येथे घेतले होते. महाराष्ट्राने दखल घ्यावी अशा प्रकारच्या या अधिवेशनामुळे खऱ्या अर्थाने ओबीसी चळवळीला चालणा मिळाली. समता परिषदेची स्थापना ही सत्तेसाठी नव्हे तर विचारासाठी आणि सामान्य कार्यकर्त्यांना, उपेक्षित घटकाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी करण्यात आली होती असे शेवटी अंबेकर म्हणाले.
समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष ॲड. सुभाष राऊत यांनी समता परिषदेचे शहराध्यक्ष तथा बैठकीचे मुख्य संयोजक दिपक वैद्य यांच्या कार्याचे कौतूक करून ओबीसींवर अन्याय झाल्यास अशा प्रसंगी छगन भुजबळ हे नेहमी अग्रेसर असतात. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुर्ववत कायम व्हावे यासाठी भुजबळांनी नेहमीच आक्रमक भुमिका घेवून ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगीतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न गानकोकीळा स्व. लतादीदी मंगेशकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी समता परिषदेची जालना शहर कार्यकारिनी घोषीत करण्यात आली असून त्यात उपाध्यक्ष शेख शाहरूख, सरचिटणीस दगडु बडदे, कार्याध्यक्ष नितिन इंगळे, सचिव शिवपखाले, संघटक शंकर सातपुते, प्रसिध्दी प्रमुख विजय साखरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीस नगरसेवक रावसाहेब राऊत, संतोष जमधडे, बाबासाहेब वानखेडे, मधुकर झरेकर, दशरथ तोंडूळे, राजु पवार, ॲड. अशपाक पठाण, बापुसाहेब गाढेकर, अशिष चव्हाण, कांताराव राजनकर, गणेश पाऊलबुध्दे, मयुर गाढेकर, संदीप मगर, ताहेर पठाण, बडे खान, सुभाष सातपुते, शुभम खंदारे, स्वप्नील श्रीसुंदर, अशिष शेजुळ, एकनाथ राऊत, अमोल धानुरे, अमोल राऊत, संदिप मगर, विजय घोडके, विठ्ठल गिराम, सोनु बबीरवाल, संतोष वडोदे, यश आघाम यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सुत्रसंचलन गणेश पाऊलबुध्दे यांनी तर शेवटी आभार मधुकर झरेकर यांनी मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *