ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बदनापूर तालुक्यातील दलित- सवर्ण वादातून राजकीय पोळी भाजणे बंद करा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर निकाळजे यांचे आवाहन

August 19, 202116:55 PM 13 0 0

जालना: बदनापूर तालुक्यातील चिखली येथे दोन समाजात झालेला वाद सामाजिक कार्यकर्ते सुधाकर निकाळजे यांच्या पुढाकाराने मिटविण्यात आला आहे. दरम्यान, राजकीय नेते मंडळींनी बदनापूर तालुक्यातील दलित- सवर्ण वाद पेटवून स्वतःची पोळी भाजने बंद करावे, असे आवाहनही सुधाकर निकाळजे यांनी केले आहे.


नागपंचमीच्या दिवशी ( ता. १२) बदनापूर तालुक्यातील चिखली येथे दोन समाजात वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. त्यामुळे गावातील वातावरण चांगलेच तापले होते. या गावात निर्माण झालेल्या वादाची माहिती मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुधाकर निकाळजे यांनी गुरूवारी ( ता. १९) गावात जाऊन उभय समाजातील व्यक्तींची भेट घेतली व वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा परिषद सदस्य गणेश डोळस, चिखली ग्रामपंचायतचे सरपंच सोनवणे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष देशमुख, जालना येथील सामाजिक कार्यकर्ते रोहिदास गंगातिवरे, किशोर बोर्डे, संतोष खरात आदींनी गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींशी या वादाबाबत चर्चा करून हा वाद मिटवला. यावेळी उभय समाजातील नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, बदनापूर तालुक्यातील दलित- सवर्ण वादातून राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे उद्योग बंद करावेत, तसेच समाजा- समाजात तेढ निर्माण करणे थांबवावे, असे आवाहन सुधाकर निकाळजे यांनी केले आहे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *