ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सामाजिक उपक्रमांनी राजेश टोपे यांच्या वाढदिवस साजरा

January 12, 202214:35 PM 51 0 0

जालना । प्रतिनिधी – विविध सामाजिक उपक्रम राबवून आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवस मंगळवार (दि 11) रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जालना शहराच्यावतीने साजरा करण्यात आला. गांधीचमन येथील महिला व बालरुग्णालय येथे वृक्षारोपण, ब्लँकेट, फळ व मास्कचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी युवक काँगे्रसचे शहराध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रसंगी बोलतांना श्री जाधव यांनी लस पुर्णपणे सुरक्षित असून सर्वांनी लसीकरण करून घेण्याची आवाहन केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे, ज्येष्ठ नेते संजय इंगळे, विद्यार्थी शहराध्यक्ष शाहबाज सय्यद ज्ञानेश्‍वर धानूरे, दशरथ तोंडूळे, राजू गवळी, कैलास शंकरपेल्ली, अ‍ॅड. दिनेश दैने, राम देवकर, फेरोज कुरेशी, महादू पोल, हरिष कांबळे, मनकर्णाबाई डांगे, शितल बरोटे, योगिता चंद, कल्पना मिसाळ, रहेमान परसोवाले आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना राजेंद्र जाधव यांनी जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टेंसचे पालन करावे, मास्क नियमीत वापरण्याचे आवाहन केले. तसेच आरोग्य विभागाने कोव्हीड 19 अनुषंगाने लागू केलेल्या नियमांचे पालन करावे, हीच आरोग्यमंत्री टोपे यांना वाढदिवसाची शुभेच्छा असेल असेही श्री जाधव म्हणाले. तसेच सर्वांनी कोव्हीड -19 लस पुर्णपणे सुरक्षित असून लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रसंगी नंदकिशोर जांगडे यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोव्हीड काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली. राज्यात टोपे यांच्या कार्यकाळात आरोग्य विषयक काम करतांना वीस-वीस तास कामे त्यांनी केली. आरोग्यमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहरच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. सकाळी 11 वाजता गांधीचमन येथील महिला व बाल रुग्णालय येथील महिला रुग्णांना ब्लँकेटचे वाटप तसेच फळ वाटप करण्यात आले. त्यानंतर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कोव्हीड-19 संरक्षणाच्या अनुषंगाने सर्व सामान्या नागरिकांना सकाळी 11.30 वाजता गांधीचमन जुना जालना परिसरात मास्कचे वाटप करण्यात आले. मास्क वाटप कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *