ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सामाजिक समता सप्ताह विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा

April 19, 202216:48 PM 24 0 0

सातारा हिरकणी (विदया निकाळजे) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधुन विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक समता सप्ताह सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत उत्साहात साजरा करण्यात आला. सामाजिक सप्ताहानिमित्त 11 एप्रिल 2022 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सातारा येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराचे उद्घाटन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त स्वाती इथापे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्व. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्राचार्य, लिपिक, अर्जदार व त्यांच्या पालकांना जाती पडताळणी कार्यपद्धतीबाबत माहिती होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस 172 महाविद्यालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या कार्यशाळेत जिल्हा जाती पडताळणी समितीची रचना, अधिकार, कार्यपद्धती व समितीस ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करावा व आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती देण्यात आली. मार्जिन मनी योजनेची माहिती देण्यासाठीही कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
13 एप्रिल 2022 रोजी समाज कार्य महाविद्यालय, सातारा येथे संविधान जनजागृतीसाठी “संविधान जागर” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्मवीर भाऊराव पाटील पॉलीटेक्निक सातारा येथे सहज सुलभ जाती प्रमाणपत्र पडताळणी कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज कशा पध्दतीने करावा व आवश्यक कागदपत्रांबाबत सविस्तर माहिती देऊन तयार वैधता प्रमाणपत्राचे वितरण विद्यार्थ्यांना करण्यात आले.
14 एप्रिल 2022 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समितीच्यावतीने वैधता प्रमाणपत्राचे वितरण अर्जदार व पालकांना करण्यात आले. सामाजिक समता सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष तथा उपायुक्त स्वाती इथापे व संशोधन अधिकारी नितीन उबाळे यांच्या मार्गदर्शनाखली सर्व कार्यक्रम पार पडले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *