ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

तज्ञांच्या अनुभवाचा समाजास लाभ मिळेल : भाऊसाहेब घुगे

September 24, 202113:04 PM 48 0 0

जालना ( प्रतिनिधी) : राज्य शासनाने लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेचे पुर्नगठण करून अभ्यासू, अनुभवी व तज्ञ संचालकांची नियुक्ती केल्याने मागास भागातील समाजबांधवांना संस्थेचा लाभ होईल. असा विश्वास युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी व्यक्त केला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठा अंतर्गत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ग्रामीण विकास व संशोधन संस्थेच्या संचालक पदी जालना
जि.प. चे माजी सदस्य तथा विधिज्ञ ॲड.संजय काळबांडे यांची राज्यपालांनी एका आदेशाद्वारे नियुक्ती केली. या नियुक्तीबद्दल त्यांचा मुंबई येथे जालना जिल्हा युवा सेनेतर्फे सत्कार करण्यात आला.
या वेळी जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हा प्रमुख अमोल ठाकूर, तालुका प्रमुख अजय कदम यांची उपस्थिती होती.

ॲड. संजय काळबांडे यांनी सत्कारास उत्तर देतांना विविध क्षेत्रातील जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण व तळागाळातील समाज बांधवांच्या समस्या जाणून घेत संस्थेच्या माध्यमातून सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *