जालना ( प्रतिनिधी) : स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत नूतन वसाहत झोन मधील प्रभाग क्रं. तीस मध्ये शनिवारी ( ता. ०९) विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गतवर्षी महाराष्ट्रात अव्वल स्थान प्राप्त केल्यानंतर जालना नगर परिषदेने यंदाही कंबर कसली असून याची तयारी म्हणून नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, स्वच्छता सभापती हरिष देवावाले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत नगर, ऑक्सफर्ड शाळा परिसरात राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत प्लॅस्टिक, कचरा,झाडझुडीने रस्ते साफ करण्यात आले. या वेळी स्थायी समिती सदस्य तथा नगरसेविका सौ. उषाताई पवार,माजी नगरसेवक अशोक पवार, प्र. स्वच्छता निरिक्षक अरूण वानखेडे, जवान श्रावण सराटे, ऑक्सफर्ड शाळेचे शिक्षक,व नगर परिषदेचे कर्मचारी,उपस्थित होते.
Leave a Reply