चित्रपट महोत्सवांसाठी चित्रपटांचे अभिरक्षण (फिल्म क्युरेटिंग फॉर फिल्म फेस्टिवल) या विषयावरील एका विशेष अभ्यासक्रमाचे आयोजन फिल्म अॅ्ण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातर्फे करण्यात आले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या चित्रपट महोत्सवांसाठी चित्रपट अभिरक्षण करण्याबाबत हा अभ्यासक्रम सहभागींना मार्गदर्शन करणार आहे. सदर अभ्यासक्रम सशुल्क असून २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या काळात ऑनलाइन आयोजित करण्यात आला आहे.
एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँ थोला म्हणाले, भारतातील अशा प्रकारचा हा पहिला अभ्यासक्रम आहे. चित्रपट महोत्सवांची आखणी करताना महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना (थीम) विचारात घेऊन त्या अनुषंगाने चित्रपट आणि इतर पूरक कार्यक्रमांची रुपरेषा तयार करणे अपेक्षित असते. चित्रपट महोत्सवांसाठी चित्रपट अभिरक्षणाचा २० वर्षांहून अधिक काळ अनुभव असलेल्या भारतातील आघाडीच्या क्युरेटर मिनाक्षी शेड्डे यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यासक्रम चालवला जाणार आहे. शेड्डे या बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारत आणि दक्षिण आशिया प्रतिनिधी आहेत. १९९८ पासून महोत्सवासाठी पाठवण्याच्या चित्रपटांची निवड त्या करत आहेत. बर्लिनसह टोरांटो, बुसान, लंडन, दुबई, कोलंबो, तसेच भारतातील इफ्फी यांसारख्या नामांकित चित्रपट महोत्सवांसाठी भारत-आशिया विभागाच्या अभिरक्षक सल्लागार म्हणून काम पहातात अशी माहिती कँ थोला यांनी दिली.
मिनाक्षी शेड्डे म्हणाल्या, सदर अभ्यासक्रम चित्रपट महोत्सवांच्या आखणीबाबत एक नवी दृष्टी देण्यासाठी उपयुक्त ठरेल. चित्रपट महोत्सवासाठी कलात्मक चित्रपट, माहितीपट, लघुपट, विद्यार्थ्यांनी बनवलेले चित्रपट, तसेच शैली आधारित, सामाजिक प्रश्नांवर आधारित, देश, समाज आधारित चित्रपटांची निवड करण्याबाबत मार्गदर्शन करणारा ठरेल असे शेड्डे यांनी स्पष्ट के ले. अभ्यासक्रमाबाबत अधिक माहिती एफटीआयआयच्या संके तस्थळावर उपलब्ध असून अर्ज करण्याचा सहा ऑक्टोबर शेवटचा दिवस आहे, अशी माहिती संस्थेकडून हिरकणी ला देण्यात आली आहे
Leave a Reply