ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना मोसंबीचे भारतीय पोस्टद्वारे विशेष आवरण्याचे ५ सप्टेंबरला विमोचन

September 1, 202212:33 PM 11 0 0

जालना । राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक(नाबार्ड) जालना जिल्हा फळे व मोसंबी बागातदार संघ व बीपीजी फार्मर प्रोड्यूसर कंपनी अंतरवाला यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मधुर बँक्वेट हॉल येथे भौगोलिक मानांकन प्राप्त जालना मोसंबीचे भारतीय पोस्टद्वारे विशेष आवरणाचे विमोचन व मोसंबी विक्री व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश टोपे, बोर्ड ऑफ ट्रेडचे सदस्य पाशा पटेल, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, नाबार्डचे मुख्य व्यवस्थापक जी.एस. रावत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, आयसी टीचे संचालक प्रो. यु. एस. अनापुरे, एक्सपोर्ट ॲडव्हायझर गोविंद हंडे, आत्माच्या प्रकल्प संचालक शितल चव्हाण, जिल्हा मोसंबी बागातदार संघाचे अध्यक्ष पांडुरंग डोंगरे यांचा समावेश आहे. यावेळी भौगोलिक मानांकन तज्ञ गणेश हिंगमिरे, रिलायन्स मोसंबी विक्री व्यवस्थापनाचे जनरल मॅनेजर दत्तात्रय मोरे, विप्रोचे ज्ञानेश्वर कदम व खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ शशिकांत पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेत कृषी विभाग प्रयोगशील मोसंबी उत्पादक जीआय तज्ञ कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ आपल्या हे मोसंबी विक्री व्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन करणार असून जिल्ह्यातील सर्व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन नाबार्ड चे डीडीएम तेजल क्षीरसागर,, बीपीजी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष भास्कर पडूळ, संचालक गणेश पडूळ व मोसंबी बागायतदार संघाचे सचिव अतुल लड्डा यांनी केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *