ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी 100 टक्के खर्च करा – पालकमंत्री राजेश टोपे

December 7, 202121:06 PM 41 0 0

जालना  :- जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातुन यंत्रणांना निधी उपलब्ध करुन देण्यात येत असतो. कोव्हीड19 ची परिस्थिती असतानाही जालना जिल्ह्याच्या निधीमध्ये एक रुपयाचीही कपात न करता 260 कोटी रुपयांचा निधी चालु वर्षासाठी शासनाकडून प्राप्त झाला असुन हा निधी 100 टक्के खर्च करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणांना दिले. जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 साठीच्या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते. व्यासपीठावर खासदार संजय जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, आमदार अंबादास दानवे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा नियोजन अधिकारी श्री सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले, चालु वित्तीय वर्षात जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यास मंजुर असलेला 260 कोटी रुपयांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला आहे. या निधीच्या माध्यमातुन जिल्ह्यात दर्जेदार व गुणवत्तापुर्ण कामे करण्यात यावीत. प्राप्त निधीपैकी एकही रुपया परत जाणार नाही याची काळजी घेऊन संपुर्ण निधी खर्च करण्याचे यंत्रणांना निर्देश देत जालना येथे क्रीडा संकुलाचे बळकटीकरण करण्यात येत असुन त्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असुन क्रीडा संकुलामध्ये ईनडोअर, आऊटडोअर खेळ सुविधा निर्माण करण्याबरोबरच क्रीडा संकुलामध्ये अत्याधुनिक अशी यंत्रसामग्रीही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विकासामध्ये महत्वाची भुमिका असलेल्या रस्त्यांच्या विकासासाठी 30:54 व 50 :54 या अर्थशीर्षाखाली ग्रामीण रस्ते व ईतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यासाठी 23 कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातुन उपलब्ध करुन देण्यात आला असुन या निधीतुन दर्जेदार व गुणवत्तापुर्ण रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे . तसेच कोव्हीड19 च्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन 78 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असुन प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन लिक्विड व पीएसए प्लँट कार्यान्वित करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
नाविन्यपुर्ण योजनेच्या माध्यमातुन ई ऑफीस संकल्पना राबविण्यात येत असुन दस्तऐवजांचे जतन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत डॉक्युमेंट कॉम्पॅक्टर तसेच अचुक व जलद मोजणीसाठी आठ रोव्हरही उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांना अखंड वीजेचा पुरवठा व्हावा यादृष्टीने एसडीटी ट्रान्सफार्मरही बसविण्यात येत असल्याचेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
वीजदेयक न भरल्यामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यात येत असुन ही अतिशय गंभीर बाब आहे. शेतकऱ्यांप्रती सहानुभूतीठेवत सरसकट वीज कनेक्शन न कापता शेतकऱ्यांसमवेत संवाद साधुन वीजदेयक भरण्याबाबत जनजागृती करण्यात यावी. यामध्ये लोकप्रतिनिधींची मदत घेण्याची सुचना करत शेतकऱ्यांकडून वीज देयकाची रक्कम टप्प्या-टप्प्याने घेऊन वीजेचा पुरवठा अखंडित राहील, यादृष्टीने काळजी घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यातील 49 मंडळापैकी 47 मंडळात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईपाईचे अनुदान प्राप्त झाले असुन दोन मंडळातील गावे ही नुकसान भरपाईपासुन वंचित राहिली आहेत. या दोन मंडळातील गावांनाही नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी एसडीआरएफमध्ये धोरणात्मक बदल करण्याबाबत सर्व लोकप्रतिनिधीसह आपण व्यक्तीश: मंत्रालयीन स्तरावर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु, असेही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी तसेच नियोजन समितीच्या अशासकीय सदस्यांनीही लोकोपयोगी अशा सुचना मांडल्या. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी श्री सुर्यवंशी यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातुन सन 2020-21 मध्ये झालेला खर्च, सन 2021-22 कोव्हीड उपयोजनोंतर्गत निधीचे पुनर्विनियोजन, सन 2021-22 मधील सर्वसाधारण, अनुसूचित जाती घटक योजना, ओटीएसपी अंतर्गत झालेला खर्च आदी माहिती सभागृहास दिली. बैठकीस समितीचे अशासकीय सदस्यांसह सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *