जालना (अनिता पवार) दि. २८ बदनापूर तालुक्यातील सायगांव येथे मिशन कवच कुंडल अंतर्गत तिसऱ्या टप्प्यात योग्य नियोजन केल्यामुळे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावात उपसभापती रविकुमार बोचरे, सरपंच प्रमोद शिंदे, पोलीस पाटील शत्रुघ्न बरांडे, नोडल अधिकारी प्रदीप जनबंधु, मुख्याध्यापक विजय वाघ, ग्रामसेविका काशी वाघ, सहशिक्षक संतोष लिंगायत, कल्पना साखरे, आशा स्वयंसेविका संगीता आर्दड, अर्चना बोचरे, अंगणवाडी कार्यकर्ती कुशावर्ता सातपुते, नीता जैस्वाल, सुनिता नवले, गोदावरी राऊत यांनी संपूर्ण गावांत लसीकरण जनजागृती केली.
गावांत लसीकरण राहिलेल्या नागरिकांची यादी करून प्रत्येकास लसीकरण केंद्रात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न केले. त्याचाच सकारात्मक परिणाम होऊन आज उत्स्फूर्तपणे नागरिकांनी लस घेण्यासाठी केंद्र गाठले.
आरोग्य विभागाचे पर्यवेक्षक दिवटे, आरोग्यसेवक विसपुते, समुदाय आरोग्य अधिकारी गायत्री कुलकर्णी, आरोग्यसेविका दुर्गा गोफणे, शिक्षक आप्पासाहेब अवघड यांनी अत्यंत नियोजनपूर्वक लसीकरण करून ठरविलेले उद्दिष्ट चांगल्या प्रमाणात पूर्ण केले.
दिव्यांग व्यक्तींना व वयोवृध्द व्यक्तींना त्यांच्या वाहनांवरच लसीकरण करण्यात आले. ज्यांना बुथवर येणे शक्यच नाही त्यांना घरी जाऊन लसीकरण करण्यात आले.
Leave a Reply