ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

रायगडात अनेक तालुक्यात महाराष्ट्र बंद च्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद लखीमपुर हिंसाचार प्रकरणी बाजारपेठ बंद

October 12, 202114:12 PM 67 0 0

उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथील हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीने आपल्या पदावरून हटवावे आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा ला अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सत्ताधारी विकास आघाडीने आज सोमवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाराष्ट्र बंद च्या हाक मध्ये कर्जत व्यापारी फेडरेशन सामील झाले होते. त्यांनी आज आपली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला आहे.


उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी येथे अन्नदाता शेतकरीराजा न्याय हक्कासाठी केंद्र सरकारच्या दारी शांततेत व अहिंसा मार्गाने आंदोलन करीत असताना शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्या साठी केंद्रसरकार मधील काही घटकानी हिंसेचा मार्ग अवलंबून शेतकऱ्यांची हत्या करण्याचा प्रकार घडला.सदर घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार मधील महाविकास आघाडीतील पक्षांनी आज महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. म्हसळयामध्ये मध्ये मात्र आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसने आणि सेना,शेकाप, काँग्रेस (आय) या पक्षानी जनतेला आवाहन स्वंतत्रपणे केले.केंद्रसरकारचा निषेध वेगवेगळे मोर्चे काढून नोंदविल्याची घटना घडली.
म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी व व्यापारी वर्गाने शासनाचे बंदला जाहीर पाठींबा देवुन बंद मध्ये सहभाग नोंदवला. यावेळी आघाडीत शिवसेना,शेकाप, काँग्रेस (आय) या तीन पक्षांचे माध्यमातून शिवसेना तालुका प्रमुख महादेव पाटील,काँग्रेस अध्यक्ष मुविज शेख,शेकाप तालुका चिटणीस संतोष पाटील यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष समीर बनकर यांच्या अध्यक्षतेखालील मोर्चेकरानी स्वतंत्रपणे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी समीर घारे यांचे जवळ केंद्र सरकारचे निषेध पत्र दिले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *