ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

“मी सावरकर बोलतोय’ नाट्यास उत्स्फूर्त प्रतिसाद”

February 20, 202113:37 PM 81 0 0

जालना (प्रतिनिधी)  नाटकासारख्या सशक्त माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राजकीय विचार नागरिकांपर्यंत पोहोचावेत या हेतूने सादर झालेल्या ‘होय, मी सावरकर बोलतोय’ या नाटकाच्या प्रयोगाला गुरुवारी (१८ फेब्रुवारी) रसिकांनी तुडुंब प्रतिसाद दिला. लॉकडाउननंतर प्रथमच मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह हाउसफुल्ल झाल्याने कलाकारांचा आनंद गगनात मावत नव्हता. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मित्र मंडळ यांच्यावतीने या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. “होय, मी सावरकर बोलतोय’ या नाटकाचे स्वेच्छामूल्य प्रयोग आकाश भडसावळे यांच्या मुंबईतील अभिजात प्रॉडक्शन्स’ या संस्थेने केले जात आहेत.

नाटकात चित्रतपस्वी भालजी पेंढारकर, पृथ्वीराजकपूर, सुभाषचंद्र बोस, मॅडम कामा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी अशा भूमिका हुबेहूब साकारून रसिकांना सावरकरांचे राजकीय विचार उलगडून दाखविण्यात आले. बहार भिडे, सचिन घोडेस्वार, नरेंद्र कुलकर्णी, कविता नाईक, सुमित चौधरी, प्रसाद संगीत आणि आकाश भडसावळे यांनी विविध भूमिका साकारल्या. रसिकांना सावरकर यांच्या सोबत कोणाच्या भेटी होत ,काय भाष्य होत होते याचे दर्शन या नाटकातून घडले. एक नवा विषय या नाटकातून रसिकांना मिळाला. नाट्यप्रयोगानंतर शक्‍य ते आणि योग्य वाटतील ते पैसे नागरिकांनी द्यावेत, अशी स्वेच्छामूल्य संकल्पना होती. लॉकडाउननंतरच्या आव्हानात्मक काळात अभिजात संस्थेने उचललेले हे पाऊलही महत्त्वाचं होतं. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व वीर सावरकर यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमी सदर कार्यक्रम हा शासनाने दिलेल्या नियमांचे भान ठेवून तसेच संपूर्ण नाट्यगृह सॅनिटाईज करून मास्कचा उपयोग प्रेक्षकांनी केला. यावेळी आर आर जोशी, सिद्धीविनायक मुळे, सुनीलभैय्या पहेलवान खरे, श्रीकांत देशपांडे, अनंतराव वाघमारे, संजय देशपांडे, अमित कुलकर्णी, संकेत मोहिदे, सुमित कुलकर्णी, अमर पवार, धनंजय डिक्कर, शुभम कौडगावकर, अमोल पाठक, गणेश लोखंडे, सौरभ पाठक, कुणाल तांबट, कृष्णा दंडे, प्रथमेश कुंटे, शुभम कोठारी, किशोर माधवले, अक्षय जैन, गणेश रेंगे, आशिष पाठक, सौ. कल्याणी कुलकर्णी. सौ. दीपाली बींनीवाले, सौ. आनंदी अय्यर, सौ. अपर्णा राजे, सौ. अरुणा फुलमामडीकर, आदींनी परिश्रम घेतले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *