जालना (प्रतिनिधी) : पिरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत जालना तालुक्यातील कडवंची उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिम सोमवार दि. 26 रोजी आयोजित करण्यात आली होती. या कोविड प्रतिबंधक लसीत 18 वयोगटाच्या पुढील नागरिकांनी यावेळी लसीकरणाला उत्तम प्रतिसाद दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरीही आरोग्य विभागाच्यावतीने कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच पार्श्वभुमीवर पिरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कबीर मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली कडवंची उपकेंद्रात तिसऱ्यांदा लसीकरण आयोजित केले होते.
यावेळी 18 वर्ष वयोगटापुढील नागरिकांनी लस घेऊन या महामारीला हरवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहेत. जगासह देशाला कोरोनाने अनेकांना जगणे शिकविले आहे म्हणुन या महामारीला रोखण्यासाठी लसीची मोहिम यशस्वी राबविली जात आहे. लस पुर्णपणे सुरक्षित असुन बचावासाठी उपयुक्त आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लसीकरणाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून न सकारात्मक विचाराने लस घेऊन अफवांवर विश्वास ठेवु नये. असे श्री बेग यांनी सांगितले. या लसीकरणास परिसरातील नागरिक चांगला प्रतिसाद देत लस घेण्यासाठी धाव घेतलेली पहावयास मिळतो आहे. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांना लस देऊन शिबिरास सुरूवात झाली यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कबीर मिर्झा बेग, एमपीडब्ल्यु के. के. बोर्डे, के.टी. हरकळ, एम.आर बदर, डी.यु. इंगळे, बी.के.जाधव, आरोग्य सहाय्यक सौ. कांचन खांडेभराड, एएनएम स्वाती माकोडे, पी. जी. भरणे, एस. के. कोल्हे, ए. बी. पैठणे, आशासेविका भारती बारवकर, उषा शिंगणे, स्वयंसेवक गणेश सोनुने, वाहन चालक भिमराव म्हस्के, ग्रामपंचायत कर्मचारी गोरख क्षीरसागर आदींनी परिश्रम घेत लसीकरण मोहीम राबवली.
Leave a Reply