ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना जिल्ह्यात क्रीडा चळवळ वाढावी – अभिजित देशमुख

September 13, 202113:20 PM 55 0 0

जालना, दि. १२(प्रतिनिधी)- जालना जिल्ह्यात क्रिडा चळवळ वाढण्यासाठी खुप वाव असून सर्व क्रिडाप्रेमींनी खेळाडूंना प्रोत्साहन दिल्यास त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्यास हेच खेळाडू जिल्ह्यासह देशाचे नाव लौकिक करु शकतात, असे मत क्रिडा पत्रकार अभिजित देशमुख यांनी व्यक्त केले. ते जालना येथील शांतीनिकेतन शाळेत शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्यासह जालना जिल्हा क्रिडाप्रेमी व कला क्रिडादुत फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षक, खेळाडू, क्रिडा संघटनांचे प्रतिनिधी तसेच खेडा प्रेमी यांच्याशी संवाद कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुध्द खोतकर,कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, चाँद पी.जे.,अरविंद देशमुख,सुभाष देठे, बाला परदेशी, धनसिंग सुर्यवंशी के.डी. दांडगे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी क्रीडा पत्रकार अभिजित देशमुख यांचा जिल्ह्याच्या वतीने त्यांचे वडील रत्नाकर देशमुख व आई शामला देशमुख यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधतांना तसेच आपले अनुभव कथन करतांना अभिजित देशमुख यांनी सांगितले की, उगीच कोणताही खेळाडू मोठा होत नाही तर त्यांच्या वागण्या-बोलण्यातील विन्रमता त्यांच्या क्षेत्राशी त्यांची असलेली निष्ठा व त्या क्षेत्रात नाव लौकिक करण्यासाठी घेत असलेली प्रचंड मेहनत हेच त्यांच्या यशामागील गमक असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अत्यंत जागतिक स्तरावरती नाव कमविणाNया सचिन तेंडूलकर, सायना नेहवाल, मायकेल फ्लेप्स, निरज चोप्रा, मीरा चानु,पी.व्ही. सिंधु यांच्यासह अनेक खेळाडूंसोबत व्यतित केलेल्या क्षणांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. अशा मोठ्या खेळाडूंचा आदर्श समोर ठेवून प्रयत्न केल्यास कोणत्याही खेळाडूस अशक्य असे काही नसल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी रिओ,टोकीयो तसेच कॉमनवेल्थ गेम्स अशा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत स्वतः टिपलेली छायाचित्रे उपस्थितांना दाखविली. तसेच अनेक खेळाडूंसोबतचे अनुभव कथन करुन उपस्थितांना प्रोत्साहीत केले. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही खेळाडूंना आवश्यक असलेले सर्व मार्गदर्शन करण्यास मी वेंâव्हाही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणे ही माझ्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब असेल असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले की,आपण अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिडा स्पर्धा घर बसल्यास टि.व्ही.वर पाहात असतो परंतु कोरोना सारख्या कठीण काळात आपल्या शहरातील एक तरुण हजारो किलोमिटर लांब जावून प्रत्यक्ष त्या खेळांचे क्षणचित्र टिपतो व अत्यंत नामांकित अशा खेळाडूंशी संवाद साधतो ही बाब अत्यंत गौरवास्पद असून आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंसाठी तसेच क्रिडा क्षेत्रात काम करणाNया अनेक कार्यकत्र्यांसाठी प्रोत्साहन देणारी असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यातील सर्वांना अभिजित देशमुख यांच्या अनुभवाचा लाभ व्हावा. या करिता कोविडच्या नियमांचे पालन करुन प्रतिनिधीक स्वरुपात आपल्याशी संवाद साधण्यासाठी त्यांना विनंती केल्याचे अंबेकरांनी सांगितले. यावेळी कार्यक्रमास वैâलास घोलप, सुभाष पारे, डॉ. तुलजेस भुरेवाल, सचिन आर्य यांच्यासह खेळाडू, प्रशिक्षक, क्रिडा संघटनांचे प्रतिनिधी, क्रिडा प्रेमी व नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार व प्रदर्शन अरविद देशमुख यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *