जालना (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्यातील एस.टी.कामगांराच्या व कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसापासून समास्या प्रलंबीत आहेत सदर प्रलंबीत समास्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सोडविण्यात येवून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात यावा अन्याथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागपूर येथील हिवाळी अधिवेशन चालू देणार नसल्याचा ईशारा भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. आज भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी जालना जिल्हयातील एस.टी. महामंडाळासमोर चालु असलेल्या उपोषणास एस.टी.कामगारांच्या व कर्मचाऱ्यांच्या उपोषणाला भेट देऊन भाजपा एस.टी. कर्मचाऱ्यांच्या पाटीशी असून एस.टी.कामगारांच्या समास्या व प्रश्न हे राज्यातील महाविकास आघाडी सरकार सोडविण्यास अपयशी ठरले असून एस.टी.कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणात पगार असतांना ते रात्र व दिवस जनतेची कमी पगारावर सेवा करीत असतात त्यांना कमी पगारावर उपजीवीका भागावि लागते त्यातच कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून एस.टी.कामगारा अडचणीत आला असून त्यांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मागण्या मान्य करुन दिलासा दयावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी राज्यसरकारकडे केली आहे.
आज जाफ्राबाद आगारातील एस.टी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बंद पुकारला त्या एस.टी बंद आंदोलनाला माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांनी भेट देऊन एस.टी कामगारांच्या समस्या जाणून घेऊन एस.टी कामगारांच्या न्याय हक्कासाठी व मागण्यांसाठी सातत्याने लढा देऊन आपल्याला न्याय मिळवून देईल असे आश्वासन दिले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे:-
एसटी कामगारांना कामाचे वेतन वेळेवर मिळावे,शासन परिपत्रकानुसार मान्य केलेले वार्षिक वेतन वाढीचा दर 3 टक्के व घरभाडे भत्त्याचा दर 8/16/24 टक्के लागू करावे,कामगार कराराच्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या महागाई भत्त्याचा दर माहे जुलै 2018 ते माहे सप्टेंबर 2018 या कालावधीची 3 महिन्याची 2 टक्के व माहे जानेवारी 2019 ते माहे सप्टेंबर 2019 या कालावधीची 9 महिन्याची 3 टक्के महागाई भत्त्याची थकबाकी एसटी कामगारांना मिळावी,शासकीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा दर 28 टक्के लागू केलेला असतानाही एसटी कामगारांना मात्र माहे ऑक्टोंबर 2019 ते आज पर्यंत 12 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे ही बाब एसटी कामगारांवर अन्यायकारक आहे.,माहे ऑक्टोबर 2019 चे वेतन हे दिवाळीपूर्वी मिळावे.,दिवाळी भेट रक्कम 15,000 रु. दिवाळी पूर्वी देण्यात यावी आदी मागण्या तात्काळ मंजूर करण्यात याव्यात व एस.टी.कर्मचाऱ्यांना यापुढे उपोषणाची वेळ येऊ देवू नये अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.
Leave a Reply