जालना, दि. २७ (प्रतिनिधी)- नुकतीच कोकणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने कोकणातील जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले. अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले. आज तेथे अन्न, वस्त्र, निवारा या सारख्या मुलभुत गरजांची पुर्तता करुन तेथील नागरिकांना आधार देणे गरजेचे आहे. या पाश्र्वभुमीवर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपला वाढदिवस बॅनर, होर्डीग यांवर होणारा खर्च टाळून लोकोपयोगी कार्यक्रम व पुरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना भवन जालना येथून जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी सातशे ब्लॅकेट्स पुरग्रस्तांसाठी पाठविले, यावेळी बोलतांना अंबेकर म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांनी जमेल ती मदत करुन कोकणातील बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. ही मदत रवाना करतांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी भाऊसाहेब घुगे, जयप्रकाश चव्हाण, महिला आघाडीच्या सविता विंâवडे, शहरप्रमुख विष्णु पाचपुâले,माजी शहरप्रमुख बाला परदेशी,संघटक दिपक रणनवरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना जिल्हाप्रमुख अंबेकर म्हणाले की, कोरोना महामारी व कोकणातील पुरपरिस्थितीमुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपला वाढदिवस पोस्टर, बॅनर आदींवर होणारा खर्च न करता पुरग्रस्तांसाठी मदत स्वरुपात देण्याचे आवाहन केले. नुकतीच मुख्यमंत्र्यांनी कोकणातील पुरग्रस्त भागाचा दौरा करुन तेथील परिस्थिती जाणून घेतली. तेथील नागरिकांना दिलासा देत मदत करण्याचे आदेश दिले आहेत. समाजाचं देणं लागतो या उदात्त भावनेतून लोकांनी या संकट काळात पुरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. जिल्हा शिवसेनेच्या वतीने पुरग्रस्तांसाठी सातशे ब्लॅकेट्स पहिल्या टप्प्यात पाठविण्यात आले असून पुढेही मदत सुरु राहणार असल्याचे अंबेकर यांनी सांगितले.
यावेळी भरत सांबरे, घनश्याम खाकीवाले, दुर्गेेश काठोठीवाले, दिनेश भगत, किशोर शिंदे, नरेश कपुर, राजेंद्र परिहार, जे.के चव्हाण, अमोल ठाकुर,संतोष रासवे, जालिंदर भुसारे, सिद्दु एखांडे,अनिल तिरूखे,रूद्दु एखांडे,रामेश्वर गाडेकर,राजु वैद्य,प्रदिप रासवे,रितेश पंचारिया, सुदाम काळे,देवेंद्र बुंदेले, रामेश्वर कुरिल, तुळजाराम माधोवाले, राजेंद्र घुगे, संतोष जमधडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.
शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपन
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जालना येथील नागेवाडी शिवारातील औद्योगिक वसाहतीत पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपन जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, युवासेनेचे राज्यविस्तारक अभिमन्यु खोतकर, युवासेना जिल्हा युवाधिकारी भाऊसाहेब घुगे च्या हस्ते करण्यात आले.
जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने कोकणातील पुरग्रस्तांना ब्लॅकेटची मदत ठवितांना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे,जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी ऊसाहेब घुगे, जयप्रकाश चव्हाण आदी. १- शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या ढदिवसानिमित्त नागेवाडी परिसरातील औद्योगिक वसाहतीत वृक्ष रोपन करतांना ल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर,युवासेनेचे अभिमन्यु खोतकर, युवासेनेचे ल्हा युवाधिकारी भाऊसाहेब घुगे, बाला परदेशी, अमोल ठाकुर आदी.
Leave a Reply