ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वाटूर येथे हरभरा खरेदीला सुरुवात

March 21, 202217:14 PM 39 0 0

परतूर/ प्रतिनिधी : तालुक्यातील वाटुर येथे शासनाचे नाफेड हमीभाव केंद्र ‘फार्मफ्युचर फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. या केंद्र अंतर्गत १५ मार्चपासून ऑनलाईन हरभरा पिकाची नोंदणी केलेली असून खरेदी केंद्राचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नाफेड केंद्राच्या वतीने हमीभावाप्रमाणे हरभरा खरेदी करण्यात येणार आहे.
या केंद्राचा फायदा वाटूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा व उर्वरित शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करून घ्याव्यात असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमास आयडियल ॲग्रोटेक कंपनी चेअरमन तथा महाफपीसीचे जालना जिल्हा प्रतिनिधी भगवानराव नाना डोंगरे, विक्रम नाना माने, गणपत आबा वारे, सरपंच डॉ. केशरखाने, उपसरपंच बद्रीभाऊ खवणे इत्यादीची उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांचे स्वागत फार्मफ्युचर कंपनीचे संचालक डॉ.गोवर्धन भुतेकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सुत्रसंचालन कंपनीचे संचालक डॉ. दीपक बहीर यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमात वाटूर हमीभाव केंद्राकडे प्रथम नोंदणी केलेले वाई येथील शेतकरी अर्जुनराव खंडागळे यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, मदन पोहेकर,अतुल खंदारे, भारत उबाळे, प्रसाद हजारे, विष्णु खडेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *