जालना (प्रतिनिधी)ः तालुक्यातील सावरगाव येथे आषाढी पौर्णिमेपासून वर्षावास प्रारंभ झाला. सर्वप्रथम तथागत गौतम बुध्द आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले.
उपस्थित भंते रेवत यांनी उपासकांना पंचशील दिले. प्रमुख पाहुने अनुराधा हेरकर या बुध्द धम्माविषयी विवेवचन करतांना म्हणाल्या की, आपण आपल्या आचरणात तथागत गौतम बुध्दांची शिकवण अनुसरुन जिवन सुखमय करावे, तथागत बुध्दांनी समस्त मानव जातीला पंचशील दिले आहे. या पंचशीलेचे पालन करावे, नव्हे तर बौध्दांचे कर्तव्य आहे. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद मगरे, संजय हेरकर यांच्यासह गावातील बौध्द उपासक उपासीका उपस्थित होेते.
Leave a Reply