ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते पाणीवेस रस्ता सुरू करा; शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांची पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी

December 7, 202121:12 PM 75 0 0

जालना, दि. ७ (प्रतिनिधी)-शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन मागील सहा महिन्यापासून बंद असलेला काद्राबाद मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते पाणीवेस जाणारा रस्ता सुरु करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, काद्राबाद मार्गे पाणी वेस ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे जाणारा रस्ता जालना शहरातील अत्यंत वर्दळीचा असणारा एक महत्त्वाचा रस्ता आहे.  या रस्त्यावर असणारी मूर्ती वेस वेळीच दुरुस्त न केल्याने धोकादायक झाली. त्यामुळे हा रस्ता मागील सहा महिन्यांपासून बंद करण्यात आलेला आहे. हा रस्ता बंद असल्याने नागरिकांची कुचंबना होत असून त्यांना दूरवरून जावे लागते.

अनेक संघटनांनी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आंदोलने करून निवेदने दिली व रस्ता लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली परंतु पुरातत्व विभाग, वक्फ बोर्ड व इतर तांत्रिक बाबींच्या सबबी देऊन जालना नगर परिषदेने हा रस्ता बंद ठेवला आहे. तरी या प्रकरणी लक्ष घालून संबंधित रस्ता सुरू करण्यात येणाNया सर्व तांत्रिक अडचणी दूर करून हा रस्ता लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला व्हावा याकरिता नगर परिषदेस कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी केली आहे. यावेळी माजी शहरप्रमुख बाला परदेशी, उपशहरप्रमुख घनश्याम खाकीवाले, संतोष सलामपुरे, किशोर नरवडे आदींची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *