जालना (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेच्या वतीने आज दि. 04 सोमवार रोजी लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रमुख मंगला धुुपे, अध्यक्ष रिजनल मॅनेजर अभिजीत पांगरेकर, रिजनल असिस्टंट मॅनेजर, औरंगाबाद शाखाचे राहीत कासाळकर यांची उपस्थित होती.
याप्रसंगी ग्राहकासाठी कर्जाच्या नविन याजनेबद्दल माहिती देऊन त्यावरील सबसिडी आणि व्याजदरा संदर्भात ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले. नवीन योजनेमध्ये कमी झालेले गृह कर्ज तसेच पीएमआय पंतप्रधान सबसिडी व शेतीसाठीच्या नविन योजना याविषयी सविस्तर माहिती दिली. या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील अभिजीत पांगरेकर यांनी ग्राहकांना केले.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पत्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा उल्लेख करावा अशी मागणी जगदीश गौड यांनी अभिजीत पांगरेकर यांच्याकडे केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रवीण खेडेकर यांनी मानले.
Leave a Reply