जालना (प्रतिनिधी) ः जालना जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागात वरिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेले सुनिल लक्ष्मीराव कुलकर्णी यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारा गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन 2019-20 या वर्षासाठी राज्यातील 43 अधिकारी व कर्मचाऱ्यांची गुणवंत पुरस्कारासाठी निवड केली असुन त्यात जालना जिल्हा पररिषदेतील कुलकर्णी यांच्या समावेश आहे.
सदर पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल कुलकर्णी यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एन. आर. केंद्रे, आर.पी. व्यास, व्हि. एन. राणे, विनोद निघवेकर, व्हि. पी. खरात, नितीन श्रीमंगले, एस. एम. माने, आकाश बरे, अरुण खोजे, गोविंद इंगळे, एस. डी. मुळे, सचिन साळवे, स्वप्नील अमृतवार, प्रदिप पाचपोहे,श्रीमती व्हि. एन. जाधव, श्रीमती ए. एल. आढाव यांच्यासह जिल्हा परिषदेच्या विविध विभागाचे खाते प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
Leave a Reply