गेली वीस वर्षे सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी संस्था म्हणून महाराष्ट्रात कार्य करणाऱ्या समांतर प्रतिष्ठान संस्थेकडून दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील समांतर प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम मध्ये मनिषा गिराम हिला देण्यात आला असून सदरील पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कारांचे वितरण ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात शुक्रवार दिनांक 12 फेब्रुवारी 2021रोजी साजई कुसुमाई हिरवाई येथे करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रमासाठी श्री.जयंतभाई पाटील (शे.का.प सरचिटणीस तथा आमदार ), श्री. किसन कथोरे साहेब (आमदार) जेष्ठ नाट्य चित्रपट कलावंत अरुणजी नलावडे, कर्जत- खालापुरचे आमदार श्री महेंद्रजी थोरवे, माजी आमदार गोटीराम भाऊ पवार साहेब , सिडको माजी अध्यक्ष प्रमोदजी हिंदुराव आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याबाबतचे समांतर प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा हुतात्मा वीरभाई कोतवाल चित्रपटाचे दिग्दर्शक लेखक गायक कवी श्री एकनाथ देसले यांचे पत्र नुकतेच प्राप्त झाले असून सदरील कार्यक्रमाकरिता मनिषा गिराम उपस्थित राहणार असून जालना जिल्ह्यातील नाभिक समाज बांधव देखील या कार्यक्रमास जाणार आहे.
Leave a Reply