ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेचे विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

January 11, 202112:49 PM 45 0 0

जाणीव अस्मितेची साहित्य परिषद ( म. रा.) शाखा उस्मानाबाद. च्या वतीने साहित्य व सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे व करत आहेत त्यांच्या कार्याचा समाजाला अभिमान वाटतो ज्यांचे अनमोल असे कार्य समाजाला व देशाला बळ देणारे आहे. हे महान कार्य नवीन पिढीस प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा याच साठी वरील तीन क्षेत्रातील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

साहित्यक्षेत्रात सातत्यपूर्ण लेखन करणारे साहित्यिक व वक्ते मा. प्रा. डॉ. बी.जी. श्रीरामे, जालना व सामाजिक क्षेत्रात सदैव कार्य करणाऱ्या तळागाळातील लोकांना सहकार्य करणाऱ्या विधिज्ञ मा. भारती रोकडे, उस्मानाबाद आणि पत्रकारिता क्षेत्रात नावीन्यपूर्ण बातम्यांचा शोध घेणारे पत्रकार मा.सुमेध वाघमारे, तेर-उस्मानाबाद या मान्यवरांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. सदर पुरस्कारांची घोषणा जाणीव अस्मितेची साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राम गायकवाड, जालना.(म. रा.)संस्थेचे कार्याध्यक्ष रमेश देहेडकर, जालना.( म. रा.)संस्थेचे सचिव- प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, लातूर. उस्मानाबादचे प्रा. राजा जगताप उपाध्यक्ष (म.रा.) व उस्मानाबाद शाखा जिल्हा अध्यक्ष- विकास कांबळे यांनी सदर पुरस्कारांची घोषणा केली आहे. राज्यस्तरीय पुरस्कार समारंभ वितरण सोहळा उस्मानाबाद येथे रविवार दिनांक १७/०१/२०२१ दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आला आहे. वरील मान्यवरांना सदरील आयोजित समारंभात मा. जेष्ठ साहित्यिक राम गायकवाड जालना यांच्या हस्ते सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल,व बुके देऊन गौरविण्यात येणार आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *