सिंधुदुर्ग (प्रतिनिधी संपदा बागीदेशमुख) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर को-औप. इंडट्रीयल इस्टेट,इचलकरंजी यांच्या मार्फत देण्यात येणारा राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार 2021 नानीबाई चिखली च्या स्नुषा सौ.निलोफर हसन अरब-शेख यांना इचलकरंजी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. तानाजी पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
व्यासपीठावर या संस्थेचे अध्यक्ष श्री.रवीसाहेब राजपुते, लोकराजा छ. शाहू महाराज चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी च्या संस्थापक अध्यक्ष मा. अरुण कांबळे, नगरपरिषदेचे आरोग्य सभापती मा. संजय केंगार,हातकणंगले पाणी पुरवठा सभापती मा. अलका कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मा.गायत्री ठोमके आदी मान्यवर उपस्थित होते.
गेली 12 वर्षे शिक्षण क्षेत्रात वैभववाडी तालुक्यात सौ.अरब-शेख मॅडम अविरत काम करत आहेत.त्यांच्या या अतुलनीय कामगिरीसाठी त्यांना या संस्थेमार्फत आदर्श शिक्षक पुरस्कार आज शिक्षक दिनाच्या औचित्यावर प्रदान करण्यात आला.
सौ.अरब-शेख मॅडम यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट पटनोंदनी पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन आज त्यांना राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार हा मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
Leave a Reply