ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

दयाराणी खरात यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार

May 27, 202220:24 PM 29 0 0

सातारा हिरकणी (विद्या निकाळजे) : जि.प. प्राथमिक शाळा माणगंगानगरच्या प्राथमिक शिक्षिका दयाराणी विलास खरात यांचा औरंगाबाद येथे ज्येष्ठ साहित्यीक आणि विचारवंत बाबा भांड आणि लातूरचे मा खासदार सुनिल गायकवाड आणि बोधी ट्री एज्युकेशन औरंगाबाद चे संस्थापक रामदास वाघमारे आणि मान्यवराच्या हस्ते औरंगाबाद येथे जीवन गौरव पुरस्कार 2022 ने नुकतेच सन्मानीत करण्यात आले.
कोरोना काळात मॅडमनी आपल्या शाळेत राबवलेल्या अनेक उपक्रम तसेच कोरोना काळात केलेली त्यांनी सामाजिक शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा सन्मानाने गौरवण्यात आले या अगोदर ही मॅडमना माण पंचायत समितीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार ; क्रांतीसूर्य फौंडेशनचा कोल्हापूर येथे आदर्श शिक्षिका पुरस्कार, डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न पुरस्कार, कोरोना जनजागृती तालुकास्तर प्रथम क्रमांक राज्यस्तरीय तृतीय क्रमांक इ अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत सामाजीक शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून त्यांना नुकतेच जीवन गौरव या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबा भांड म्हणाले की, अंकुरणाऱ्या भावी पिढीला घडविणाऱ्या शिल्पकाराचा सन्मान होणे योग्यच:
शिक्षक ही केवळ व्यक्ती नसून संस्काराचे एक विद्यापीठ आहे विद्यार्थी घडवून एक संवेदनशील नागरिक घडवणे व अशा नागरिकांचा माध्यमातून राष्ट्रनिर्मिती व मनुष्यनिर्माणाचे कार्य करून शिक्षक हा खऱ्या अर्थाने सृजनकाचा साधक आहे असे प्रतिपादन पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *