ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेची राज्यस्तरीय बैठक संपन्न

October 25, 202113:56 PM 54 0 0

बदनापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे राज्यस्तरीय बैठक नुकतीच बदनापूर येथील विभागीय कार्यालयात संपन्न होऊन महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेच्या समाजाच्या विकासासाठी विविध कार्यक्रमाचे आयेाजन करून सर्वधर्मिय सामूहिक विवाह, जात प्रमाणपत्र शिबिरे, रक्तदान शिबिरे, नेत्र तपासणी शिबिरे, समाजातील गोरगरीबांना मदत करणे, समाजातील मतभेद मिटविणे, समाजातील विद्यार्थ्यांचे सत्कार करणे, राज्यातील विविध जिल्ह्यात सर्व धर्मीय जातीचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम आयोजित करणे, राज्यातील विभाग, जिल्हा व तालुका कार्यकारिणीची निवड करणे आदी समाजोपयोगी कार्यक्रम राबवावे तसेच राज्यातील सर्व तालुका व जिल्हा शाखा स्थापन करून समाजाला प्रगतीपथाकडे नेण्यासाठी सामूहिक प्रयत्नांना प्रशासकीय जोड मिळावी म्हणून संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.


बदनापूर येथे महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयात परिषदेचे प्रदेश अध्यक्ष अकरमखान पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य कार्यकारिणी व राज्यभरातील मुस्लिम तेली समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक आज दुपारी पार पडली. महाराष्ट्रभरातून या बैठकीसाठी जळपास 200 ते 250 नागरिकांनी हजेरी लावून विविध विषयावर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष पठाण यांनी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिष्द करत असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषद व प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जात प्रमाणपत्र काढण्यासाठी विशेष परिश्रम घेऊन शिबिर घेण्यात आलेले असून 700 ते 800 विविध धर्मातील जात प्रमाणपत्र विनामुल्य तयार करण्यात आलेले आहे. हे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी मोठा कार्यक्रम घेण्यात यावा यासाठी तारीख व प्रमुख पाहुणे कोणाला बोलावे या बाबत चर्चा करण्यात येऊन या सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील मुस्लिम तेली समाजातील राजकीय, सामाजिक व प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रीत करावे त्याचप्रमाणे आपले कार्य सर्वांसमोर यावे म्हणून व मुस्लिम तेली समाजाला नेहमी मदत करणाऱ्या राजकीय व्यक्तींना या कार्यक्रमानिमित्त बोलावून त्यांचा सत्कार करावा असे ठरवण्यात आले. त्याचप्रमाणे आगामी काळात औरंगाबाद जिल्ह्यात, बदनापूर, जालनासह भोकरदन तालुक्यातील कार्यकारिणीने आपआपल्या भागातील सर्वधर्मिय व्यक्तींना जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी शिबिरे आयोजन करून विनामुल्य जात प्रमाणपत्र तयार करून देण्याचा उपक्रम राबवावा असेही सर्वानुमते ठरवण्यात आले.
महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेच्या वतीने शेती व उद्योग व्यवसाय करून जीवनक्रम जगतो. असे असताना अनेक अडचणींना सामना त्यांना करावा लागतो. महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेच्या माध्यमातून हा सर्व समाज संघटीत करून शासन दरबारी शेतीपुरक योजना त्यांना मिळवून देण्याचा प्रयत्नही करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच मुस्लिम तेली तरूणांना उद्योग- व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण, बँक कर्ज प्रकरणाबाबत मार्गदर्शन, आर्थीक सक्षमीकरणांतर्गत काही मदत करून त्यांना उद्योग व्यवसायात आणण्यासाठी यापुढे मुस्लिम तेली परिष्द कार्य करणार असल्याचेही यावेळी सचिव अक्रम खान पठाण यांनी सांगितले. यावेळी चर्चा करताना अनेक ज्येष्ठ सदस्यांनी परिषद करत असलेल्या कामाबाबत समाधान व्यक्त करून यापुढे राज्यभरातील प्रत्येक जिल्हयात व तालुक्यात कार्यकारिणी तयार करून महाराष्ट्र मुस्लिम तेली समाज एकत्र करण्यासाठी परिषदेने अग्रेसर राहावे असे आवाहन केले. आगामी काळात सर्व तालुका व जिल्हयात कार्यकारिणी तयार करून जिल्हानिहाय भव्य सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात येऊन या परिस्थितीत समाजात विवाहावर होणारा वाढता खर्च कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिला शिक्षण, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, समाजात आपआपसातील मतभेद असेल तर ते मिटवून एकोप्याने राहून कार्य करण्याचा सल्लाही यावेळी देण्यात आला. समाजातील एखादा व्यक्ती गरीब असेल व त्याला प्रवाहात आणण्यासाठी मुस्लिम तेली परिषद त्याला आर्थीक पाठबळ देण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करण्याची गरजही यावेळी व्यक्त करण्यात आली.
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सदरील बैठक पार पडली. या बैठकीसाठी महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे मार्गदर्शक तथा प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष इलियास खान यांनी बाहेरगावी असल्यामुळे ऑनलाईन सहभाग नोंदवून समाजाच्या विविध प्रश्नांसाठी एकत्र येऊन कार्य करत राहून आपल्या समाजाचा एक दबाव गट तयार करण्याच्या सूचना केल्या. या दबावगटामुळे भविष्यात समाजाच्या विविध प्रश्नांवर राजकीय व प्रशासकीय पाठिंबा त्यामुळे मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीला महाराष्ट्र मुस्लिम तेली परिषदेचे अध्यक्ष तथा प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्रचे सेक्रेटरी अकरमखान पठाण, उपाध्यक्ष अय्युब खान पठाण, मिर्झा अहेमद बेग, शेख अनिस, जनरल सेक्रेटरी मिर्झा तन्वीर बेग, खजिनदार शेख शौकत, कार्यकारिणी सदस्य शेख गुलामनबी, शेख फकिरा, मिर्झा हारुण बेग, सदस्य मिर्झा इलियास बेग, शेख मोबीन, सय्यद रफीक अली, सय्यद नसीर बिरादर, शेख बशीर, मिर्झा युसुफ बेग, मिर्झा नवाब बेग, मिर्झा अमिन बेग, मिर्झा अजमतऊल्ला बेग, समीर खान, गफ्फार खान, अमजद खान, अय्युब खान, शेख अख्तर, शेख अब्दुल कादर, शेख इम्रान, मिर्झा कदीर बेग, मिर्झा अफझल बेग, युनुस खान, मिर्झा अजिज बेग, शेख हारुण, मिर्झा शिकुर बेग, रफिक पठाण, मिर्झा इर्शाद बेग, सय्यद अहेमद, सय्यद खाजा, शेख गुलाम अहेमद, शेख अय्युब, मिर्झा कय्युम बेग, मिर्झा नवायद बेग, मिर्झा गुलजार बेग, हाजी सय्यद चांद, हाजी सय्यद बशीर, हाजी शेख वहाब, शेख सत्तार लाईमन, शेख अरमान, इम्रान खान, हाजी सय्यद रज्जाक मौलाना, मिर्झा जावेद बेग यांच्या सह असंख्य उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *