ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गोशीन रियूच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड

October 19, 202114:33 PM 25 0 0

उरण (संगीता ढेरे) जिल्हा स्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत ( आर्मीचर किक बोसक्सिन्ग असोशिएशन वाको)गोशीन रियू कराटे च्या विद्यार्थ्यांनी विविध गटात भाग घेतला होता.

त्यामध्ये अनेकांनी घवघवीत यश प्राप्त केले. अनिश पाटील, अमिता घरत, अमिषा घरत,रोहित घरत, समीक्षा पाटील नेहा पाटील, सुजित पाटील, अर्णव पाटील, शुभम ठाकूर, यांनी गोल्डमेडल पटकाविले.त्यांची निवड अहमदनगर येथे 23 ते 24 ऑक्टोंबर 2021 रोजी होणाऱ्या राज्य स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. व तूमन्ना गावंड, श्रुती म्हात्रे, श्लोक ठाकूर सिल्व्हर मेडल तर अंश म्हात्रे व अमर घरत यांनी ब्रॉन्झ मेडल पटकाविले. तसेच तिथे जिल्हा स्तरीय पंच परीक्षा घेण्यात आली त्यामध्ये अमिता घरत, अमिषा घरत, अनिश पाटील मानसी ठाकूर, रोहित घरत,शुभम ठाकूर गोपाळ म्हात्रे,संतोष मोकल,शुभम म्हात्रे, कमलाकर म्हात्रे,कंकेश गावंड, प्रीतम मोकळ,पंच परीक्षेत उत्तीर्ण झाले. ही स्पर्धा जयेश चोगले-अध्यक्ष, राजू कोळी, महेंद्र कोळी, भूपेंद्र गायकवाड उपाध्यक्ष, शिल्पाम सारकर सचिव ,राजेश कोळी यांनी यशस्वी केली.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन राकेश म्हात्रे, गोपाळ म्हात्रे, यांनी केले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *