लाडजळगाव प्रतिनिधी दि.२५/१/२१ शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील सुप्रशिध्द बालसाहित्यीक कु.अस्मिता राजेंद्र मराठे यांच्या आभाळमाया कविता संग्रहास शब्दगंध साहित्यीक परिषद महाराष्ट राज्ययांचे वतीने आभाळमाया काव्य संग्रहास राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.पंधरावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन प्रसंगी मान्यवरांचे हस्ते पुरस्कराचे वितरण होणार असुन सन्मानचिन्ह,मानपत्र ,शाल श्रीफळ असे पुरस्कराचे स्वरुप आहे.
कु.अस्मिता मराठे ही श्री शिवाजी ज्युनिअर काॅलेज बोधेगाव येथील इयत्ता बारावी विज्ञान या वर्गात शिकत असुन तिचे इंद्रधनुष्य काव्यसंग्रह,न्याय मिळालाच पाहिजे …ही एकांकिका व आभाळमाया हा कविता संग्रह प्रकाशित असुन अनेक मासिके,दिवाळीअंक,प्रातिनिधीक कविता संग्रहातुन काव्य लेखन प्रकाशित आहे.आकशवाणी केंद्रावर अस्मिताचे काव्यवाचन व निवेदन प्रसारित असुन अनेक पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलेले आहे.
सन २०१९ या वर्षीच्या परीक्षण समितीतील कविवर्य चंद्रकांत पालवे,प्रा.शर्मिला गोसावी,सुभाष सोनवणे,श्याम शिंदे,प्रा.डाॅ.अशोक कानडे यांनी परीक्षक म्हणुन काम पाहिले.तर प्रा सुनिल गोसावी यांनी निवडीचे पत्र दिले.
पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल,प्राचार्य श्री डि. व्ही .अकोलकर,पर्यवेक्षक डी . ए.पवार व सर्व प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थांकडुन अभिनंदन होत आहे..
Leave a Reply