उरण ( संगिता पवार ) उरण शहर व परिसरातील आमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे .त्यात मुख्यते तरुण वयातील मुले -मुली ह्या व्यसनाला बळी पडत आहेत .त्यावर आळा बसण्याच्या उद्देशाने उरण शहरातील जागरूक नागरिकांनी नुकतेच उरण पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार यांना निवेदन दिले .
त्या निवेदनात म्हटले आहे की , उरण शहर व परिसरातील आमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे .त्यात मुख्यते तरुण वयातील मुले -मुली ह्या व्यसनाला बळी पडत आहेत .त्या कडे गांभीर्याने दखल घेऊन कायदेशीर कारवाई करावी .जेणे करून तरुण पिढी या प्रवाहात भरकटत जाणार नाही .
निवेदन देतांना इमरान बुबेरे ,अदनान खान ,अदिब भाईजी ,हनीफ बक्षी ,मार्जान तुंगेकर ,फहाद पटेल ,सउद कुंवावाला ,अॅड .नियाज पठाण आदी उपस्थित होते .
Leave a Reply