ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

टाऊनहॉल येथील जीवघेणा खड्डा बुजवा भाजप सांस्कृतिक सेलचे पालिकेला निवेदन

March 15, 202220:28 PM 24 0 0

जालना, प्रतिनिधीः जुना जालना भागातील टाऊन हॉल परिसरातील माजीमंत्री भगवंतराव गाढे यांच्या पुतळ्या समोरील जीवघेणा खड्डा तात्काळ बुजवावा अथवा त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी भाजप सांस्कृतिक सेलच्या वतीने नगर पालिकेला निवेदनाद्वारे सोमवारी करण्यात आली. यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी विजय फुलंब्रीकर यांना निवेदन देण्यात आले. वारंवार मागणी करूनही ड्रेनेज खड्डयाकडे नगर पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. उपाययोजना न केल्यास खड्डयासमोर उपोषण करण्याचा इशारा सेलच्या जिल्हाध्यक्षा शुभांगी देशपांडे यांनी दिला आहे. परिसरातील रस्त्याचे काम सुरू होईल तेव्हा होईल ,तोपर्यंत त्या ड्रेनेजच्या खड्ड्यावर ढापा टाकून तो तात्पुरता बंद करण्यात यावा हे निवेदनात सांगण्यात आले.
या खड्ड्यात छोटी वाहने, चार चाकी गाड्या, सारख्या मोठ्या गाड्या देखील पडत आहेत. अडकत आहेत. कालच एका कार चालकाला इजा होऊन दहा टक्के पडलेले आहेत. आतापर्यंत येथे अनेदा अपघात होऊन अनेकजण जखमी झाले आहेत. अपघात होण्याचा घटना येथे वारंवार घडत आहेत.
दरम्यान निवेदन दिल्यावर नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांच्याशी संपर्क साधला असताना त्यांनी खड्ड्यावर ढापे टाकण्याचे आश्‍वासन दिल्याचे देशपांडे यांनी सांगितले. नगरपालिकेचे बांधकाम अभियंता सय्यद सौद यांनीही तात्काळ ढापे टाकण्याचे आश्‍वासन दिले.यावेळी शुभांगी देशपांडे, रोहिणी टाकळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *