ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरण यांच्या वतीने खेळाचे मैदान व रेल्वे संदर्भात मागण्यांचे निवेदन

February 9, 202212:05 PM 51 0 0

उरण (तृप्ती भोईर) : सोमवार दिनांक ७/०२/२०२२ रोजी ठिकाण परेल टिळक भवन येथे कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरण आणि कोटगाव ग्रामसुधारणा यांच्या वतीने प्रलंबित खेळाचे मैदानाचा ताबा आज तागायत सिडकोने दिलेले नाही याबाबत व रेल्वे संदर्भात मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा. नाना पटोले आणि रायगड जिल्हा अध्यक्ष मा. महेंद्र घरत साहेब यांच्या कडे लेखी स्वरूपात सुपुर्द करण्यात आले.
यावेळी महेंद्र घरत यांनी या विषयावर सिडको एम. डी. बरोबर चर्चा करून एका महिन्याभरात रेल्वे कमिटी व कोटगाव ग्रामस्थ पंच यांची संयुक्त मिटींग सिडको बरोबर लावून देण्याचे आश्वासन दिले आहे.
कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरण व कोटगाव ग्रामसुधारणा उरण यांच्या वतीने प्रलंबित खेळाचे मैदानाचा ताबा व रेल्वे संदर्भातील मागण्यांचे निवेदन सादर करण्यासाठी यावेळी कोटगाव प्रकल्पग्रस्त कृती सेवा संस्था उरण अध्यक्ष नवनीत भोईर , व ग्रामसुधारणा मंडळ उरण चे अध्यक्ष योगेश गोवारी, प्रकाश पाटील, कृष्णा जोशी, सुनील भोईर , सुनील पाटील, निलेश भोईर , सुभाष भोईर ,सुरज पाटील आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *