उरण दि 14(संगीता ढेरे ) पिरकोन गावातील नागरिकांना मोफत लसीकरण उपलब्ध व्हावे म्हणून ग्लोबीकॅान कंपनीचे हेड जेकब सर, जे आर लॅाजिकस्टीकचे मालक जितेंद्र कटारमल, पंजाब काँनवेअर कंपनीचे एच.आर संजय भाई, न्यू ट्रान्स इंडीयाचे एच.आर अंबादास यादव सर, अमेया कंपनीचे एच. आर. श्याम दाने, ओ.एन.जी.सी.चे एच.आर. यांना पिरकोन ग्रामपंचायतीत सी.एस.आर. फंडाअतंर्गत कोरोना रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पिरकोन गावातील प्रत्येक नागरिकाचे मोफत लसीकरण होण्यासाठी (अर्थात लस उपलब्ध करून देण्यासाठी) पिरकोन ग्रामपंचायतीचे मार्फत पत्रव्यवहार करण्यात आले.
यावेळी उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड,पिरकोन गावातील भारतीय जनता पक्षाचे गाव अध्यक्ष सूनील घरत,उरणच्या पालवी हॅास्पिटलचे डॅा सुरेश पाटील,पिरकोन गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील, पिरकोन गावातील सामाजिक कार्यकर्ते हरेद्र गावंड, ग्रामसेवीका उर्मीला म्हात्रे व पिरकोन ग्रूप ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.पिरकोन गावातील नागरिकांचे मोफत लसीकरण व्हावे यासाठी हे सर्व मान्यवर कार्यरत आहेत.
Leave a Reply