ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विविध मागण्यांचे भीम आर्मीतर्फे निवेदन

December 23, 202113:59 PM 39 0 0

जालना/प्रतिनिधी : भीमा कोरेगांव आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या 26 ऑक्टोंबर 2018 च्या शासन आदेशाची त्वरीत अंमलबजावणी करावी, या मागणीसह अन्य मागण्यांचे भीम आर्मी (भारत एकता मिशन) च्या वतीने जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन दिले.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले की, भीमा कोरेगाव दंगलीप्रकरणी माजीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिव प्रतिष्ठाण हिंदुस्तानचे अध्यक्ष मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, छत्रपती संभाजी महाराज स्मारक वढू बुद्रूक तसेच महाराजांवर अंतीम संस्कार करणारे गोविंद गोपाळ महार गायकवाड समाधी वढू बुद्रूक दोन्हीही संरक्षीत स्मारक घोषीत करून, राज्य सरकारने या वास्तू ताब्यात घेवून त्याचा विकास व देखभाल करावी, 2 व 3 जानेवारी 2018 रोजी राज्यभरात झालेल्या आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या शासन निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करून आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरू करावी, शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यास असमर्थ ठरलेल्या व दफ्तर दिरंगाई करणार्‍यांवर दोषारोप निश्‍चीत करून कारवाई करावी, माजी न्यायमंत्री जे.एन. पटेल आयोगाचा अहवाल लवकरात लवकर मागवून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या निवेदनावर भीम आर्मी जिल्हाध्यक्ष सुभाष दांडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष एम.यु. पठाण, महिला जिल्हाध्यक्ष रंजनाताई जाधव, सुनिताताई मगरे, वसंत पातोडे आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *